Viral Video: आजच्या काळात बरेच तरूण घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह करत आहेत. यांना कुणाचीही भीती राहीलेली नाही. आई-वडिलांच्या विरोधात लग्न केल्यामुळे अनेक हत्येच्या घटना घडतात. दरम्यान सोशल मीडियावर पळून गेलेल्या जोडप्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या जोडप्यांनी पळून जाऊन चक्क धावत्या ट्रेनमध्येच लग्न उरकलं आहे.
ट्रेनमध्येही कोणी लग्न करु शकतं, सांगितल्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही मात्र हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला पटेल की असंही कोणी लग्न करु शकतं.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, सुरूवातीला ट्रेनमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी दिसतेय. या गर्दीतच प्रियकर आपल्या प्रेयसीस काही तरी समजवताना दिसतोय. त्यानतंर ती त्याला मिठी मारते, तो तिला खाली बस असं सांगतो.तरूणी ट्रेनच्या सीटवर बसल्यावर तरूण त्याच्या जवळील मंगळसुत्र तरूणीच्या गळ्यात घालतो.
बाजूच्या सीटवर बसलेल्या प्रवासी महिला तिच्याजवळ असलेला फुलांचा एक हार तरूणाला आणि एक हार तरूणीला देते. हार घेतल्यानंतर तरूणी उभी राहेत त्यानंतर दोघं एकमेंकाना सगळ्यांच्या साक्षिने हार घालतात. परत एकदा तरूणी त्याला मिठी मारते अन् पायापडते. ट्रेनमधली सगळी गर्दी या जोडप्यांच्या भोवती जमली आहे. या गर्दीतले लोकच यांना लग्नासाठी पाठिंबा देताना दिसत आहेत.व्हायरल व्हिडिओ हा max_sudama_1999 या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
धावत्या ट्रेनमधील लग्नाचे ठिकाण हे आसनसोल ते जसिडीड मार्गादरम्यानचे आहे. ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या अनेक प्रवाशांनी हे लग्न आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे. या व्हायरल व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या तुफान प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलय की,’चलती ट्रेन में शादी वाह वाह क्या बात हैं’. या व्हिडिओवर काही यूजर्संनी या जोडप्यांचे अभिनंदन केले आहे. तर काही यूजर्संनी याच्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.हा व्हिडिओ सध्या सर्वच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तसंच मोठ्या प्रमाणात शेअरही केला जातोस.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५