धरणगाव : – राज्यासह जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण काही केल्या कमी होत नसून अशातच भरधाव आयशरच्या दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धरणगाव शहरानजीक घडली. मोरेश्वर लोटू अत्तरदे (वय-५० रा.साळवा ता. धरणगाव) असं अपघातातील मृताचे नाव असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत असे की धरणगाव तालुक्यातील साळवा येथील मोरेश्वर लोटू अत्तरदे आपल्या वडिलांसह वास्तव्याला असून ते गेल्या चार ते पाच दिवसांपासून ते नातेवाईकांकडे मुंबई येथे गेले होते. गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ते मुंबई येथून धरणगाव येथे आले होते. दरम्यान धरणगाव येथून त्यांनी त्यांच्या दुचाकीने गावी साळवा येथे जाण्यासाठी सकाळी ६.३० वाजता निघाले.दरम्यान धरणगावच्या पुढे असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ चोपडाकडून धरणगावकडे येणाऱ्या अज्ञात आयशर वाहनाने जोरदार धडक दिली.
या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर साळवा गावातील नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५