इंदूर : योगा करण्यासाठी येणाऱ्या महिलांना अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या एका व्यक्तीला मध्य प्रदेशच्या इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. मोईन खान असे ३५ वर्षीय आरोपीचे नाव आहे. दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी मोईनने गार्डनमधून योगा करून परतणाऱ्या महिलांना मोठ्या आवाजात अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी दुचाकीवरून जात होता. याप्रकरणी पोलीस तपास करत असून कायदेशीर कारवाई करत आहेत.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना इंदूरच्या पंढरीनाथ पोलीस स्टेशन परिसरात घडली. येथील अटलबिहारी उद्यानात रोज सकाळी अनेक महिला योगगुरू रत्नेश यांच्याकडून योग शिकण्यासाठी येतात. दि. २४ नोव्हेंबर रोजी दररोजप्रमाणे महिला योगासने करून बागेतून बाहेर पडल्या. दरम्यान, कटकपुरा, इंदूर येथे राहणारा ३५ वर्षीय मोईन खान मागून दुचाकीवरून जात होता. चालत्या बाईकवरून तो मोठ्या आवाजात अश्लील व्हिडिओ चालवत होता, असा आरोप आहे. मोईनने हा व्हिडिओ महिलांना दाखवण्याचाही प्रयत्न केला.
मोईनच्या या कृतीचा महिलांनी विरोध केला तेव्हा त्याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. काही वेळाने मोईन तेथून निघून गेला. पीडितांनी आरोपीच्या दुचाकीचा क्रमांक नोंदवला. दुसऱ्या दिवशी योगगुरू रत्नेश हिंदू संघटनांसह पंढरीपूर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी मोईनविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवून त्याच्या दुचाकीच्या नंबर प्लेटवरून त्याची चौकशी सुरू केली. अखेर आरोपीला अटक करण्यात आली.
याआधीही दि. १३ ऑगस्ट २०२१ रोजी इंदूरच्या याच पंढरीनाथ पोलीस स्टेशन परिसरात मुस्लिम तरुणांकडून वंचित समाजाच्या दोन मुलींची छेडछाड झाल्याची घटना समोर आली होती. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी विरोध केला असता आरोपींनी तिलाही मारहाण केली. पोलिसांवरही हल्ले झाले. याशिवाय दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी इंदूरमध्ये बांगड्या विकण्यासाठी आलेल्या तस्लीमने एका अल्पवयीन मुलीचा गोलू नाव देऊन विनयभंग केला होता. त्यानंतर पोलिसांनी तस्लीमला पॉक्सो कायद्यांतर्गत तुरुंगात पाठवले.
हे पण वाचा
- धक्कादायक! शिक्षण संस्थेत नोकरी सुरू ठेवण्यासाठी संस्था चालकाचा शिक्षिकेवर गेल्या १० वर्षापासून वारंवार बलात्कार.
- पत्नीने प्रियकर व त्याच्या मित्रास २० हजार रुपये देवून पतीस संपविले, शक्तिवर्धक औषधाच्या ओव्हरडोसने मृत्यू झाल्याचा केला बनाव, पण तिच्या भावाने केला भंडाफोड.
- VIDEO : नवऱ्यांच्या त्रासाला कंटाळून दोन बायका इन्स्टावर पडल्या एकमेकांच्या प्रेमात; पळून जाऊन केलं मंदितरात लग्न.
- माझ्या आयुष्यात पाच ते सहा महिन्यात जे घडलं आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडून आयुष्य संपवत आहे; सोशल मीडियावर पोस्ट करत एकतर्फी प्रेमातून तरुणाने संपवलं जीवन.
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार