छत्रपती संभाजीनगर : अभियंता असलेल्या २८ वर्षीय तरुणीने एका तरुणासोबत व्यावसायिकाला मैत्रीच्या नात्यात चांगलेच ‘अडकवले’ अन् एक दिवस बदनामीची भीती दाखवून त्याच्याकडून चक्क चार लाखांची खंडणीही उकळली. एवढ्याने तिचे मन भरले नाही तर त्यानंतरही ११ लाखांची खंडणी मागितली. त्यातील काही पैसे देताना मात्र आधीच सापळा लावलेल्या एमआयडीसी सिडको पोलिसांच्या जाळ्यात ती अलगद अडकली.स्वाती विष्णूकांत केंद्रे (वय २८, रा. प्लॉट ३, दर्गा रोड, सातारा, मूळ रा. नांदेड) असे तरुणीचे नाव आहे. तर तिचा साथीदार फरार झाला आहे. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या तरुणीला झटपट श्रीमंत होणे चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी सुदर्शन घोडके (४०, रा. सिडको, नाव बदलले आहे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मे २०२३ मध्ये एका ॲपवरून त्याची स्वातीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघे भेटले, तिने ओळख वाढविली अन् एक दिवस त्याच्याकडून लाखो रुपये उकळत त्याला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला. तिने आजवर अनेकजणांकडून खंडणी मागितल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पहिल्या भेटीत जवळीक:
आरोपी स्वातीशी ओळख झाल्यानंतर तिने सुदर्शनला भेटण्यासाठी बोलाविले. सुरवातीला तिने ‘सायली’ असे नाव सांगितले. दरम्यान, सुदर्शनला तिने ‘माझे लग्न झालेले असून माझा पती नेहमी कामानिमित्त बाहेर राहतो, त्यामुळे मला चांगला मित्र हवा’ असे म्हणत सुदर्शनसमोर ‘लाँगलाइफ मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. पहिल्याच भेटीत सुदर्शनने तिला ‘मी संसारी माणूस असून हा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही’ असे म्हणत निघून गेला. त्यानंतर दोन दिवसांनी स्वातीने सुदर्शनला फोन केला आणि ‘तुझे म्हणणे बरोबर आहे, पण आपली फक्त मैत्रीच ठेवूयात’ असे म्हटल्याने त्यानेही होकार दिला. बदनामीची भीती दाखवून तरुण व्यावसायिकाकडून उकळले पैसेपहिल्याच भेटीत त्याच्यासमोर ठेवला ‘लाँगलाइफ मैत्रीचा’ प्रस्ताव एमआयडीसी सिडको पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकली हळूहळू केली पैसे उकळण्यास सुरुवातसुदर्शनने तिचा मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारला खरा, मात्र तिने जवळीक आणखीनच वाढविली आणि एक दिवस त्याला कौटुंबिक कारणे सांगत पैशांची मागणी केली. तेव्हा सुदर्शनने तिला ४० ते ५० हजार रुपये दिले.
दिवाळीच्या तोंडावर दिला पहिला धक्का:
सुदर्शन हा आपल्या पट्ट्यात आल्याचे दिसताच तिने दिवाळीत सुदर्शनला फोन करून ‘आपल्या ओळखीसंदर्भात माझ्या पतीला समजले असून आमच्या दोघांत वाद झाले आहेत. पतीने मला व्यवसायासाठी दिलेले पाच लाख रुपये परत करावयाचे आहेत. हे पैसे तू दे, नाही तर तुझ्या घरी येऊन आई-वडिलांना भेटून आपल्या संबंधाची माहिती देईन, समाजात बदनामी करीन’, अशी थेट धमकीच दिली. या धमकीला फिर्यादी घाबरला. सात नोव्हेंबररोजी स्वाती दुचाकीने (एमएच २०, एफक्वी ०६६२) सुदर्शनला भेटण्यासाठी कलाग्रामजवळ आली.तिथे अगोदरच दूरवर उभ्या केलेल्या कारमध्ये आरोपी संतोष मुंढे हा तिचा पती असल्याचे तिने त्याला सांगितले होते. नंतर तिने सुदर्शनला फोन लावण्यास सांगितले असता, समोरून ”मी तिचा पती संतोष मुंढे बोलतोय” असे सांगत त्याने पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर रोख तीन लाख, ७५ हजार रुपये फोन पे आणि २५ हजार रुपये असे चार लाख रुपये बॅंक खात्यावर ट्रान्स्फर केले. त्यानंतर स्वातीने आठ नोव्हेंबररोजी शंभर रुपयांच्या बॉण्डवर तुला यानंतर कोणताही त्रास देणार नाही, पैसे मागणार नाही असे लिहून दिले.
व्हिडिओ क्लिपची धमकी देत लग्नासाठी बळजबरी
१५ नोव्हेंबररोजी सिडकोतील सुदर्शनच्या कार्यालयात स्वाती गेली. तिने माझ्याकडे तुमच्या व्हिडिओ क्लिप असून माझ्यासोबत लग्न करा, अन्यथा तुमची समाजात बदनामी करीन, अशी धमकी दिली. लग्न करायचे नसेल तर मला ११ लाख रुपये द्यावे लागेल, असे ती म्हणाली. त्यानंतर मात्र फिर्यादीच्या पायाखालची वाळू सरकली अन् त्याने थेट पोलिस ठाणे गाठले.
ताहेरची स्वातीसोबत अशी झाली ओळख
स्वाती ही मूळ नांदेड जिल्ह्यातील आहे. तर आरोपी ताहेर पठाण हा छत्रपती संभाजीनगरातील रहिवासी आहे. स्वातीने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळविली होती, त्याचदरम्यान तिची एका ॲपवरून ताहेरशी ओळख झाली. त्यानंतर ती शहरात आली होती. दोघे काही दिवसांपासून एकत्र राहत होते, दरम्यान दोघांचे चांगलेच सूत जुळले. त्यानंतर दोघांनी मिळून खंडणी मागण्यास सुरवात केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
ताहेर पठाण फरार
सापळ्यादरम्यान आरोपी ताहेर आणि संतोष मुंढे हे दोघेही नव्हते. ही खबर लागताच ताहेर फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, संतोष मुंढे हा स्वाती केंद्रे हिचा पती असल्याचे भासविण्यासाठी ताहेरनेच स्वतःचे नाव संतोष मुंढे ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सापळ्यासाठी ‘बच्चो का बॅंक’मधील नोटांचा वापर
२३ नोव्हेंबररोजी सुदर्शनने एमआयडीसी सिडको ठाण्यात धाव घेत आपबीती कथन केली. आरोपी स्वाती, आरोपी ताहेर पठाण, सुदर्शन मुंढे यांना खंडणीपोटी पैसे द्यायची इच्छा नसल्याचा अर्ज दिला. हे प्रकरण एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांनी गांभीर्याने घेत चलनातील पाचशे रुपयांच्या दोन खऱ्या नोटा वर-खाली लावून मध्ये ‘बच्चो का बॅंक’मधील नोटा लावत १२ बंडल तयार करत तिला खंडणीसाठी तयार ठेवले. मॉस्को कॉर्नर भागात सापळा लावण्यासाठी निरीक्षक गौतम पातारे हे उपनिरीक्षक आत्माराम घुगे, कोमल तारे, गायकवाड, पंचासह गेले. काही वेळातच स्वाती तिथे आली. फिर्यादीकडून पैशांचे बंडल स्वीकारताच सुदर्शनने इशारा केला आणि आधीच सापळा रचलेल्या पोलिसांनी तिला अलगद पकडले.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५