धरणगाव:- येथे उबाठा सेनेने आज आगळेवेगळे आंदोलन केले. पाण्यासाठी चक्क पाइपाची अंत्ययात्रा काढली. धरणगावचा पाणी प्रश्न हा कधी संपणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे. मात्र राजकारणासाठी पाणीप्रश्न सोडविला जात नाही, असे अनेकांचे मत झाले आहे. मोठा माळीवाडा परिसरातील गुलाबराव वाघ यांच्या घराजवळील बोरवेलमधील मोटर जळालेली होती. एक महिन्यापासून नगरपालिकेचे कर्मचारी मोटर काढून घेऊन गेले. एक महिना झाला तरी बोरवेलमध्ये मोटर टाकली नाही म्हणून परिसरातील सर्व नागरिकांनी बोरवेलमधील पाइप दोर वायर बैलगाड्यांमध्ये टाकून नगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ अंत्यायात्रा काढण्यात आली.
तसेच नगरपालिका प्रशासनाच्या निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेसह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष तथा युवा सेना जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी माळी समाज अध्यक्ष विठोबा महाजन, रावा महाजन, उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, शहरप्रमुख भागवत चौधरी, माजी नगरसेवक जितेंद्र धनगर, कैलास महाजन, सुरेश महाजन, नाना महाजन, काशिनाथ महाजन, जगन महाजन, गणेश महाजन, राहुल रोकडे, भगवान महाजन, अमोल चौधरी, भीमा धनगर, नितीन महाजन, बाळू महाजन, नवल महाजन, संतोष सोनवणे, हरी महाजन, कैलास महाजन, पप्पू महाजन, पंढरीनाथ महाजन, दीपक महाजन आदी उपस्थित होते.
प्रत्येक नगरपालिका व विधानसभेच्या निवडणुकीत धरणगावच्या पाणी प्रश्नावर राजकारण केले जाते गेले. अनेक वर्षापासूनची ही समस्या आहे. धरणगावकरांना देखील या समस्ये सवय झाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील या मतदारसंघाचे नेतृत्व करतात.तरी देखील धरणगावची पाणी समस्या कायम आहे, ही शोकांतिका आहे. यापूर्वी देखील भाजप, राष्ट्रवादी, आता उबाठा अशा सगळ्याच पक्षांनी पाण्यासाठी नगरपालिकेवर आंदोलने केली आहेत. मात्र प्रशासन देखील पाण्याबाबत ढिम्म दिसते.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५