नवी दिल्ली :- पती आणि पत्नीच्या नात्यात लहान लहान कारणांवरून वाद होत असतात. अनेकदा वाद विकोपाला जातात आणि गुन्हेगारी कृत्य घडतं. बऱ्याचदा पती किंवा पत्नीचं अफेअर असणं, अफेअरचा संशय असणं अशा गोष्टी याला कारणीभूत असतात. आता अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत पत्नीने कथित बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीला जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.ही घटना राजधानी दिल्लीजवळच्या नोएडातली आहे. या ठिकाणी पत्नीने तिच्या प्रियकरासह मिळून पतीवर जीवघेणा हल्ला केला.
मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय, असं समजून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. आसपासच्या नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेलं आणि त्यानंतर पीडित पतीच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या संदर्भातलं वृत्त ‘इंडिया टीव्ही’ने दिलं आहे.सेक्टर-24 पोलीस स्टेशन हद्दीतल्या मोरना गावात राहणाऱ्या एका महिलेने तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत मिळून तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला केला. घटनेबद्दल गुन्हा दाखल करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सेक्टर-24 पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अमित कुमार यांनी सांगितलं, की मोरना गावातले रहिवासी छोटा बाबू रावत यांनी सोमवारी रात्री पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
त्यांच्या तक्रारीनुसार, संध्याकाळी ड्युटीवरून घरी परतल्यानंतर त्यांनी टिकेंद्र सिंह चौहानला आपल्या घरी पाहिलं. टिकेंद्र हा चौडा गावचा रहिवासी आहे. त्यांनी पत्नी दुर्गाला विचारलं, की टिकेंद्र घरी का आला आहे. त्यावर ती संतापली आणि त्याच्याशी भांडू लागली. पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले, की पीडित पतीने तिला विरोध केला असता दुर्गा आणि टिकेंद्र यांनी घरात असलेल्या लोखंडी रॉडने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे पती गंभीर जखमी झाला.पीडित पती बेशुद्ध पडल्यावर दोघांनीही त्याला मृत समजून तेथून पळ काढला. जवळच्या नागरिकांच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रावत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पीडित छोटा बाबू रावत यांच्या तक्रारीवरून टिकेंद्र सिंह चौहान आणि दुर्गा रावत यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५