Viral Video: आयुष्यभर स्मरणात राहील असा एक महत्वाचा क्षण म्हणजे लग्न. सध्या बरेच जण विविध प्रकारे लग्न सोहळ्याचे आयोजन करतात. काही जण डेस्टिनेशन वेडिंग करतात. तर काही लग्नात हटके गोष्टी करून आपल्या लग्नात चारचांद लावतात. प्रत्येकाला असे वाटते की आपलं लग्न अशा ठिकाणी व्हावे, ज्यामुळे ते लग्न प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहील. असं म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण एका जोडप्याने लग्नाची गाठ चक्क प्रायव्हेट जेट म्हणजेच विमानात बांधली आहे.
ऐकून आश्चर्याचा धक्का बसला ना? यू्एईमधील प्रसिद्ध भारतीय व्यावसायिकाने आपल्या मुलीचं लग्न धरतीतलावर नसून आकाशात लावले आहे ते प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक नक्की आहेत तरी कोण? या लग्नाची सोशल मीडियात एवढी चर्चा का होत आहे? दिवाळी सरली की अनेकांना लग्नाचे वेध लागते. तुळशीचं लग्न पार पडलं की अनेकांच्या घरात सनईचे सूर ऐकू येतात. पण एका जोडप्याने आपल्या लग्नातील सनईचे सूर प्रायव्हेट जेटमध्ये वाजवले आहे, आणि या लग्नाची चर्चा सोशल मीडियात खूपच रंगली आहे.
यू्एईमधील प्रसिद्ध भारतीय उद्योगपती दिलीप पोपले यांनी आपल्या मुलीचा विवाह चक्क विमानात लावून दिले आहे. हा अनोखा विवाह सोहळा २४ नोव्हेंबर रोजी ३५० पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. यात पोपले यांचे मित्र आणि नातेवाईक यांचा समावेश होता.या लग्नाच्या निमित्ताने वधू-वरांसह सर्वांनी दुबई ते ओमान असा तीन तासांचा प्रवास केला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिलीप पोपले दुबईत राहतात.
आपल्या मुलीचा विवाह हटके करण्याचे त्यांचे स्वप्न होते. १९९४ मध्ये पोपले यांचं लग्नही एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये पार पडलं होतं.व्हायरल व्हिडिओमध्ये विमानाची आतील बाजू दिसत आहे. शिवाय विमान आतून एका मंडपाप्रमाणे सजवण्यात आले आहे. सुरुवातीला मंडळी हिंदी गाण्यावर ठेका धरताना दिसून येत आहे. नंतर त्याच विमानात या जोडप्याने सात फेरे घेतले. व्हिडीओच्या शेवटी दिलीप यांची मुलगी अन् जावई हे सर्वांचे आभार मानतात. या आगळ्या वेगळ्या लग्नाला लोकांनी पसंती दर्शवली आहे.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५