सातारा : घरातून सकाळी महाविद्यालयात जाते, असे सांगून बाहेर पडलेली तरुणी सकाळी-सकाळीच लॉजवर मित्रासोबत निघाली होती. मात्र, लॉजसमोरच घरातल्यांनी तिला रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिच्या मित्राला अक्षरश: त्यांनी धू-धू धुतलं. एवढेच नव्हे तर कारमध्ये घालून कास पठारावरही नेलं. या ठिकाणी एका शेतात पालथं झोपवून त्याला बेल्टने बेदम मारहाण केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तरुणीचा चुलत भाऊ, दोन काका यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी १९ वर्षांची असून, तिचा मित्र उवैश नसीम अंसारी (वय २०) हा उत्तर प्रदेशमध्ये राहतो. पब्जी खेळत असताना दोघांची ओळख झाली. सोमवार, दि. ४ रोजी सकाळी ८ वाजता पीडित तरुणी आणि उवैश हा सातारा शहरातील एका लॉजवर निघाले होते. तरुणीच्या घरातल्यांना तिची शंका आल्याने त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली होती. तिचा पाठलाग करत तिचा चुलत भाऊ, दोन काका लाॅजपर्यंत पोहोचले. यावेळी तरुणी आणि तिचा मित्र उवैश हा लाॅजमध्ये निघाले होते.
तत्पूर्वीच घरातल्यांनी दोघांनाही रंगेहाथ पकडले. तिच्या मित्राला त्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर कारमध्ये घालून कास पठार परिसरात नेले. या ठिकाणी रस्त्याच्याकडेला गाडी उभी करून उवैशला एका शेतात नेले. या ठिकाणी त्याला पालथे झोपवून त्याच्या पाठीवर, पायावर बेल्टने बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर त्याला घेऊन संबंधित नातेवाईक सातारा शहर पोलिस ठाण्यात आले. त्या तरुणीच्या फिर्यादीनुसार उवैशवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.दरम्यान, नातेवाइकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या उवैशला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला. त्याच्या जबाबानुसार पोलिसांनी तरुणीचा चुलत भाऊ, लहान व मोठे काका यांच्यासह अनोळखी दोघांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. सध्या उवैश अंसारी हा पोलिसांच्या कोठडीत आहे.
उवैश घेतोय अभियांत्रिकीचे शिक्षण..
उवैश हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. उत्तर प्रदेशहून तो तरुणीला भेटण्यासाठी साताऱ्यात आला होता. मात्र, तरुणीच्या घरातल्यांनी त्याला पकडल्याने तो सध्या जेलची हवा खात आहे. त्याच्या आई-वडिलांनाही या प्रकाराची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे. परंतु अद्यापही कोणी आले नाही.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.