नवी दिल्ली:- संसदेत आज महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एका तरुणाने गोंधळ घातला. त्याच्यासोबत यावेळी एक हरियाणाची महिलादेखील होती. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे.संसदेवर अशाप्रकारे कुणी घुसखोरी करुन गोंधळ कसा घालू शकतो? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. संबंधित प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाला खळबळून जाग आली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी घोषणाबाजी करणारा आणि संसदेच्या सभागृहात पिवळा धूर करणाऱ्या तरुणाचं अमोल शिंदे असं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीच्या वरिष्ठ पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांना याप्रकरणी अधिकची माहिती मिळवण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर पोलीस अमोल शिंदे याच्या लातूर जिल्ह्यातील झरी गावात दाखल झाले.अमोल शिंदे हा लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी आहे. संबंधित घटनेनंतर चाकूर पोलीस तातडीने झरी गावात दाखल झाले. ते झरी गावात विचारपूस करत अमोल शिंदे याच्या घरी पोहोचले. यावेळी पोलिसांनी अमोल शिंदे याच्या आई-वडिलांना त्याच्याविषयी माहिती विचारली. अमोल धनराज शिंदे असं त्याचं पूर्ण नाव आहे. अमोलची घरची परिस्थिती खूप बेताची आहे. त्याचे आई-वडील मजूर आहेत. ते मजुरी करुन उदरनिर्वाह भागवतात. दुसरीकडे अमोल हा शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांना चौकशीतून समोर आली आहे.
गावकऱ्यांना अमोल विषयी जास्त माहिती नाही
अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून काय करत होता? याची चौकशी पोलिसांनी यावेळी केली. पोलिसांनी त्याच्या झरी गावातील नागरिकांची चौकशी केली. अमोलच्या नातेवाईकांशी चर्चा केली. गावातील नागरिकांशी चर्चा केली. गावातील कुणालाही अमोल याच्याविषयी जास्त माहिती नाही. अमोलला गावात राहायला आवडत नसे, अशी देखील माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
अमोल पोलीस भरतीची तयारी करायचा
पोलिसांनी अमोल शिंदे याच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच त्याच्या घरात कागदपत्रे ठेवलेल्या भागाची झडती घेतली आहे. पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांची चौकशी केली असता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली. अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता. तो कुटुंबिय आणि गावापासून दूर राहत होता. तो गेल्या 15 दिवसांपूर्वी दिल्लीला जातो असं आई-वडिलांना सांगून निघून गेला होता, अशी माहिती समोर आलीय. अमोल शिंदे हा दिल्लीत का गेला? नेमकं काय काम होतं? त्याच्यासोबत कोण-कोण होतं? याचा तपास पोलीस आता करत आहेत.
हे पण वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






