महिलेस मारहाण करून विनयभंग.चार जणा विरोधात अँट्रासिटी चा गुन्हा दाखल.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी एरंडोल
एरंडोल-
घराशेजारी राहणा-या महिलेस माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव अशी मागणी करून सदर महिलेचा विनयभंग करून तिला व तीच्या बहिणीस मारहाण केल्याची घटना आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास विखरण रस्त्यावरील गजमल नगर येथे घडली.याबाबात पिडीत महिलेच्या तक्रारीवरून चार संशयितांविरोधात अँट्रासिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी,की विखरण रस्त्यावरील गजमल नगर येथील रहिवासी असलेली महिला सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घराबाहेर उभी होती.त्यावेळी शेजारी राहणारा पंकज उर्फ गणेश चौधरी याने सदर महिलेस तुला या ठिकाणी राहायचे असेल तर माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील असे सांगितले.पंकज चौधरी यास सदर महिलेने नकार दिला असता त्याने तिला ओढून खाली पाडले आणि तिच्याशी अश्लील वर्तन केले.सदर महिला त्याच्या पासून सुटका करून पळत असतांना पंकजने तिला लाकडी दांड्याने मारहाण केली.तसेच पंकजवचे वडील दत्तू चौधरी,आई आशाबाई चौधरी,बहिण प्रियांका चौधरी यांनी देखील मारहाण केली.सदर महिलेने आरडाओरड केल्यामुळे तिची आई व बहिण आले असता त्याना देखील चारही जणांनी मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

मारहाणीमध्ये सदर महिलेच्या हाताला,पायाला व गुप्त जागेवर मार लागला आहे.याबाबत पिडीत महिलेच्या तक्रारीवरून चारही संशयीतांविरोधात अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तपास करीत आहेत.

टीम झुंजार