Viral Video:एका चोरट्या काकूंनी मॉलमध्ये महिनाभराचे सामान चोरी करण्यासाठी अशी काय पद्धत वापरली;आश्चर्याचा धक्का बसेल पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक वेळा हे व्हिडीओ आपल्याला विचार करण्यास भाग पडतात; तर काही खूपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या चोरट्या काकूंनी मॉलमध्ये चोरी करण्यासाठी अशी काय पद्धत वापरली; जी पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक काकू चोरीच्या उद्देशाने मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेल्या. त्यांनी चोरीची पूर्ण तयारीही केली होती.

पायजम्याच्या आत त्यांनी अशी एक पँट घातली होती; ज्यात मॉलमधील महिनाभराचे सामान सहज बसेल. पण, त्यांची ही चोरी फार काळ लपू शकली नाही. त्या सामान घेऊन मॉलमधून बाहेर पडण्याआधीच सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडले.काकूंना पकडल्यावर स्वाभाविकत: त्यांच्याकडून चोरलेले सर्व सामान जप्त करण्यात आले. पण, त्यांनी हे सामान पायजम्यात अशा प्रकारे लपवले होते की, जे बाहेर काढताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. काकूंनी ज्या प्रकारे चोरीचे सामान पायजम्यात भरले होते ते पाहून असे वाटत होते की, त्यांचे पोट जणू काही एखाद्या कांगारूसारखे आहे;

ज्यात मोठ्या प्रमाणात सामान सहज राहू शकते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक काकू न थांबता त्यांच्या पायजम्यातून मॉलमधून चोरलेल्या वस्तू बाहेर काढताना दिसत आहेत. पहिल्यांदा त्यांना पाहून असे वाटते की, त्या खूप लठ्ठ आहेत. पण त्या लठ्ठ नसून, त्यांनी सामान चोरी करण्यासाठी घातलेल्या पायजम्यामुळे त्या लठ्ठ दिसत होत्या. यावरून तुम्ही कल्पना करा की, त्यांनी किती सामान चोरले असेल. काकू सामान चोरून मॉलबाहेर पडण्याआधीचएक महिला सुरक्षा रक्षक त्यांना थांबवते आणि चौकशी करीत चोरलेले सामान बाहेर काढण्यास सांगते; ज्यानंतर संपूर्ण सत्य बाहेर येते. चोरट्या काकूंनी आपल्या पायजम्यात एक-दोन नव्हे, तर अनेक वस्तू लपवल्या होत्या. त्यात काही घरातील गरजेचे सामान आणि काही कपड्यांचा समावेश होता.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत.व्हिडीओ पाहून अनेकांनी व्वा! काय टॅलेंट आहे, अशी कमेंट केली आहे; तर काही जण, हे कोणी कसे काय करू शकते? लोक हे सर्व कसे करतात? असे सवाल उपस्थित केले आहेत. @AnilSha89142589 नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.एका युजरने व्हिडीओवर कमेंट करीत लिहिले की, काकू सांताक्लॉज झाल्या आहेत. दुसर्‍या युजरने लिहिलेय की, काकूंनी २०२४ साठी संपूर्ण सामान आधीच भरले आहे.काही लोकांनी काकूंना समर्थनही दिले आहे. त्यांना सपोर्ट करीत एका युजरने लिहिलेय की, हे करण्यामागे त्यांची काहीतरी मजबुरी असावी. दुसर्‍या युजरने लिहिलेय की, मी मान्य करतो की, त्यांनी चूक केली आहे; पण तुम्ही एखाद्याच्या असहायतेची चेष्टा का करीत आहात?

टीम झुंजार