मुरादाबाद :- एकतर्फी प्रेमातून कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. याचाच प्रत्यय उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून समोर आला आहे. येथील मुंढापांडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी तरुणी आंघोळ करत असताना एका तरुणाने त्याच्या मोबाईलमधून व्हिडीओ आणि फोटो काढले. यानंतर आरोपीने तिथून लांब जात कुवेत गाठले. पीडित तरूणीच्या लग्नाच्या काही दिवस आधी आरोपीने कुवेतमधूनच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले अन् एकच खळबळ माजली.
पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या नातेवाईकांकडे तक्रार केली असता त्यांनी पीडितेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आणि कुटुंबीयांना मारहाण केली. दरम्यान, पीडित मुलीच्या आईने आरोपी इंतेझार आणि त्याचे तीन भाऊ नावेद, अथर आणि परवेज यांच्यावर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत पीडितेच्या आईने सांगितले की, इंतेझारचा मुलगा महमूद याने पीडित मुलीचे आंघोळ करताना नग्न अवस्थेत फोटो काढले होते आणि व्हिडीओ बनवला होता. यानंतर आरोपी कुवेतला गेला. माझ्या मुलीचे लग्न १५ डिसेंबरला नियोजित असताना त्याने लग्न मोडण्यासाठी हे केले.

पीडितेच्या आईने सांगितला घटनाक्रम
पीडित तरूणीच्या आईने सांगितले की, आरोपीच्या या घृणास्पद कृत्याची तक्रार करण्यासाठी ती त्याच्या घरी गेली असता, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीच्या बापाने तिला आणि तिच्या मुलाला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि घरातून हाकलून दिले. सात डिसेंबर रोजी इंतेझारचा भाऊ नावेद, अतहर आणि परवेज पीडितेच्या घरात घुसले होते. त्यांनी पीडित मुलीला पळवून नेण्याचा देखील प्रयत्न केला.
यानंतर आरोपीने तरुणीच्या होणाऱ्या पतीला अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवून संबंध तोडण्याची धमकी दिली. पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने त्यांना धमकावले. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल. कुवेतमध्ये बसलेल्या आरोपीला मुरादाबाद येथे आणण्यासाठीही प्रयत्न केले जातील.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.