रांची :- लग्न अवघ्या दोन महिन्यांवर आलं असताना तरुणीचा मृतदेह तिच्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. नेहमी आनंदी जगणाऱ्या मोहिनी बालाने आत्महत्या कशी केली असा प्रश्न कुटुंबियांना पडला आहे.तिचा मोबाईल चेक केला असता त्यात अनेक खुलासे झाले. रात्री दोन वाजेपर्यंत चॅट करत बसलेल्या मोहिनीने सकाळी गळफास कसा घेतला याचा उलगडा मोबाईलवरून झाला आहे. रांचीतील मोहिनी नावाच्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.मोबाईलमधून अशी माहिती समजली की, तरुणीला ब्लॅकमेल करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं. नितीश राणा नावाच्या तरुणाने हे कृत्य केलं.
सुखदेवनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रपुरी रोड नंबर १२ वर तरुणीने गळफास घेतला. मोहिनीच्या काकांनी पोलिसांना सांगितले की, १५ डिसेंबरला रात्री जेवल्यानंतर ती नेहमीप्रमाणे खोलीत गेली. शनिवारी सकाळी ती खोलीतून बाहेर आली नाही तेव्हा हाक मारली. तरीही दरवाजा उघडला नाही. खिडकीतून पाहिले असता तिने दुपट्ट्याच्या मदतीने गळफास घेतला होता. दरवाजा तोडून तिला खाली उतरवण्यात आलं पण तोपर्यंत मृत्यू झाला होता. रविंद्र यांनी सांगितलं की, मोहिनी मिळून मिसळून राहणारी मुलगी होती. तिचं लग्न फेब्रुवारी महिन्यात होतं आणि लग्नाची तयारीसुद्धा चालली होती.
पोलिसांनी तपास करत असताना मोबाईल चेक केला. त्यात तरुणीला नितीश राणा नावाचा तरुण त्रास देत होता असं समजलं. लग्न करू नये यासाठी दबाव टाकत होता आणि असं केलं नाही तर आत्महत्येसाठी प्रवृत्त करत होता. रात्री उशिरापर्यंत नितीश राणा तिला त्रास देत होता. शुक्रवारी रात्री १ वाजून ५० मिनिटापर्यंत नितीश मोहिनीसोबत चॅटिंग करत होता.नितीशमुळेच मोहिनीने आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. मोहिनीच्या काकांनी सुखदेवनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यात नितीश राणाने आत्महत्येचा दबाव टाकल्याची शंका व्यक्त करत कायदेशीर कारवाईची मागणी केलीय.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५