खळबळजनक! सहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना मोबाईलमध्ये पोर्न व्हिडीओ पाहण्याचे व्यसन,दोघांनी त्याच्याच वर्गातील विद्यार्थिनीवर केला बलात्कार

Spread the love

झाशी :- मध्ये एक सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. सहावीत शिकणाऱ्या मुलीवर तिच्यासोबतच शिकणाऱ्या दोन मुलांनी बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली आहे. ही घटना पोलिसांना सांगितल्यानंतर पहाटे दोन्ही किशोरवयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. तपासावेळी पोलिसांना समजले की, ज्या दोन मुलांनी हे कृत्य केले आहे, त्यांना मोबाईलवर पोर्न व्हिडीओ पाहण्याचे व्यसन जडले होते. पोलिसांनी त्यांचा मोबाईल तपासला त्यावेळी त्यांच्या मोबाईलच्या गॅलरीत पॉर्न फिल्मच्या क्लिप मोबाईलमध्ये आढळून आल्या आहेत.

मोबाईल ॲप इन्स्टॉल

ज्या दोन मुलांनी आपल्याच वर्गातील मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे, त्या दोघांच्याही मोबाईलमध्ये अडल्ट मोबाईल ॲप इन्स्टॉल केले आहे. ही मुलं शाळेतही पॉर्न फिल्म बघत होती. पॉर्न फिल्म पाहत असतानाच त्यांनी वर्गातील मुलीला एका निर्जनस्थळी घेऊन गेले होते. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुलीचीही वैद्यकीय तपासणी करून मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली.

निर्जनस्थळी अत्याचार

बाम्हौरी कला परिसरात राहणाऱ्या सातवीतील दोन मुलांनी सहावीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. त्या दोन्ही मुलांनी तिला शाळेतून एका निर्जनस्थळी घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली.

मुलं झाली फरार

मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देऊन मुलांना ताब्यात घेण्याची विनंती केली. मात्र ही या घटनेची माहिती पोलिसांना समजली असल्याचे मुलांना समजल्यानंतर मात्र त्या दोघांनीही घरातून पळ काढला होता. मात्र पोलिसांनी त्यांचा शोध चालूच ठेवला होता, त्यामुळे ती दोन्ही मुंल घरी आल्याचे समजताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या दोघांचंही वय 13 आणि 15 वर्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे पण वाचा

टीम झुंजार