CCTV Video: पापा की परी म्हणत दुचाकीवरून खाली पडणाऱ्या मुलींचे अनेक व्हिडीओ आजवर व्हायरल झाले आहे. अपघात झाल्यावर तो कितीही हस्यास्पद असला तरी मुलींना वाचवण्यासाठी सर्वजण धाव घेतात.मात्र एका तरुणाने असं न करता गर्दीचा फायदा घेत हात साफ केलाय. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी दुचाकीवरून चालल्या आहेत. रस्त्याने जास्त असताना अचानक वाहन चालवणाऱ्या मुलीचा तोल जातो आणि ती खाली कोसळते.
तिच्या पाठोपाठ मागे बसलेली मुलगी देखील खाली पडते. दोघीही खाली कोसळल्याने सर्वजण त्यांच्या दिशेने धाव घेतात. तरुणींना वाचवण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या अनोळखी व्यक्ती त्यांच्या दिशेने धाव घेतात. गर्दी जमा होते. नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी बाग्यांची देखील गर्दी होते. काही वेळाने मुलींच्या पायावरून एक तरुण दुचाकी बाजूला करतो.

अन्य व्यक्ती त्यांना उठून उभे राहण्यास मदत करतात. मुली स्वतःला सावरून थोड्या उभ्या राहतात आणि आपली स्कूटी शोधण्यास सुरुवात करतात. त्यावेळी स्कूटी त्यांना तिथे दिसत नाही. आधीच पायाला लागल्याने त्या त्रस्त असतात त्यात आता स्कूटी कुठे गेली या विचाराने आणखी चिंतेत येतात. ही संपूर्ण घटना समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुली जेव्हा खाली पडतात तेव्हा त्यांच्या पायावरून ज्याने दुचाकी बाजूला घेतली तो तरुण दुचाकी घेऊन फरार होतो.जमलेल्या गर्दीचा फायदा घेत तरुणीने मोठ्या चतुराईने दुचाकी चोरली आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. @thats_ak7 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी हसण्याचे ईमोजी पाठवलेत. तर काहींनी तरुणाने चोरी केल्याने संतापही व्यक्त केलाय.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






