जळगाव | भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जाणार्या १३ वर्षीय मुलाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी जळगाव शहराकडून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. सुजय गणेश सोनवणे (वय१३) असे मयत मुलाचे नाव असून यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली असून घटनास्थळी पोलीस पोहचले आहे.
काय आहे घटना ?
सुजय सोनवणे हा मुलगा आज दुपारी साडे अकराच्या सुमारास जळगावहून मोहाडी गावाकडे जात होता. याप्रसंगी गावाजवळ असलेल्या उताराजवळ एमएच-२८ बी ७७०३ या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या एमएच १९ डीएम ११ या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुजयचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून तेथे आप्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि.प. सदस्य पवन सोनवणे, जळगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल आदींसह इतरांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली आहे.