जळगाव :- दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री.भुकन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर तसेच नवीन वर्षाच्या स्वागतार्थ अवैध मद्य विक्री तसेच निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सर्वत्र जळगाव जिल्ह्यात दारूबंदी विभागाच्या वतीने सुरू असून
यामध्ये पाचोरा विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी आज जामनेर-बोद वड रस्त्यावर अवैधपणे ताडी(मद्य) वाहतूक करणारी मारुती इको गाडी क्रमांक एम एच ०२ एफ इ ९९४७ या क्रमांकाची गाडी जप्त करून यामधील ४०० लिटर तयार ताडी व आरोपी नामे मोहमद अजीद यास ताब्यात घेण्यात आले असुन महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ, ई अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबत पुढील तपास विलास पाटील करीत आहेत.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






