मुंबई :- पोलिसांनी 3 जणांना 18 वर्षीय मुलीच्या ऑडिशनची क्लिप पॉर्न साईट (Porn Site) वर टाकल्याच्या आरोपाखाली कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तीन मुलांनी तरूणीला काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत बोल्ड सीनचं ऑडिशन देण्यास सांगितलं. हा वेब सीरीजचा भाग असल्याचं समजून तिने बोल्ड सिन दिले मात्र नंतर त्यांनी हे व्हिडिओ पॉर्न साईट वर अपलोड केले.
हे व्हिडिओ वायरल झाल्यानंतर सारा प्रकार प्रकाशझोकात आला.Hindustan Times,च्या रिपोर्ट नुसार तरूणीला तिचे बोल्ड सिनचे व्हिडिओ वायरल झाल्याचे मित्राकडून समजलं. मागील महिन्यात आरोपींनी तरूण मुलीला अर्नाळा ला बीच वर बोलावलं. यावेळी दिग्दर्शकासह चारजण होते. कॅमेरामॅन, अभिनेता आणि महिला मेकअप आर्टिस्ट देखील होते. तरूणीने केलेल्या तक्रारी मध्ये तिला एका लॉजवर नेण्यात आले आणि तेथे इंटिमेट सिन शूट केल्याचं तिचं म्हणणं आहे.
हा व्हिडिओ केवळ ऑडिशन असेल आणि त्याचा अन्यत्र वापर केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं मात्र काही दिवसांतच तिच्या मित्राने एका पॉर्न साईटवर हा व्हिडिओ पाहिला. 14 डिसेंबरला महिला पोलिस स्थानकांत पोहचली आणि तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींचा त्यांच्या मोबाईल नंबर वरून तपास लावला.
यामध्ये पोलिसांना अजूनही काही लोकांचा समावेश असल्याचं अंदाज आहे. अशाप्रकारे मुलींचे ऑडिशनच्या नावाखाली व्हिडिओ बनवून ते पॉर्न साईट वर अपडेट केल्याचा अंदाज होता.Information Technology Act, 2000 आणि आयपीसी च्या विविध कलमांखाली आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींनी असं म्हटलं आहे की ते प्रोडक्शन हाऊस साठी काम करतात.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा