मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा १ ते २९ जून दरम्यान २० संघांमध्ये होणार आहे. पहिला सामना १ जून रोजी कॅनडा आणि अमेरिका यांच्यात होणार आहे. तर, अंतिम सामना २९ जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर होणार आहे. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. तर भारत पाकिस्तान सामना ९ जून रोजी होणार आहे. भारताचा तिसरा सामना १२ जूनला अमेरिकेसोबत आणि चौथा सामना १५ जूनला कॅनडाशी होईल. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघांची प्रत्येकी पाच संघांच्या चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताला अ गटात पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिकेसोबत ठेवण्यात आले आहे.
कोणती टीम कोणत्या गटामध्ये?:-
अ गटामध्ये भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनेडा आणि अमेरिकेचा समावेश आहे. ब गटामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलँड आणि ओमान आहे. क गटामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, यूगांडा आणि पापुआ न्यू गुनिया आहे. तर ड गटामध्ये दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स आणि नेपाळ आहे.
अशी होणार स्पर्धा:- लीग स्टेज :
१ ते १८ जून दरम्यान खेळवली जाईल. प्रत्येक गटातील संघ आपापसात एक एक सामना खेळतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील.
सुपर-८ :
१९ ते २४ जून दरम्यान खेळवले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ येथे सहभागी होतील. एकूण आठ संघ प्रत्येकी एक सामना खेळणार आहेत. येथून अव्वल चार संघ बाद फेरीत पोहोचतील.
नॉकआऊट :
जे सुपर-८ मध्ये चांगली कामगिरी दाखवतील ते चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पहिला उपांत्य फेरीचा सामना २६ जूनला तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना २७ जूनला होणार आहे. यानंतर उपांत्य फेरीतील दोन्ही विजेत्यांमध्ये २९ जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.टी-२० विश्वचषक २०२४ चे आयोजन अमेरिकेतील तीन आणि वेस्ट इंडिजमधील सहा मैदानांवर होणार आहे. २० पैकी दहा संघ यूएसमध्ये २९ दिवसांच्या स्पर्धेतील त्यांचे पहिले सामने खेळतील, १६ सामने लॉडरहिल, डॅलस आणि न्यूयॉर्क येथे होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामना ९ जून रोजी लाँग आयलंडमधील न्यू नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.वेस्ट इंडिजमधील सहा वेगवेगळ्या बेटांवर ४१ सामने खेळवले जातील, उपांत्य फेरीचे सामने त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि गयाना येथे खेळवले जातील आणि अंतिम सामना २९ जून रोजी बार्बाडोसमध्ये खेळवला जाईल.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४