जळगाव, दि.८ जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध आस्थापनावरील ५२३ रिक्त पदांवर काम करण्याची संधी चालून आली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र वअरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विभागाच्या वतीने १० जानेवारी रोजी खाँजामीया रस्त्यावरील एस.एन.डी.टी महिला महाविदयालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात तरूणांनी सहभागी व्हावे. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाचे सहायक आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.
नोकरी इच्छुक उमेदवारासाठी ही सुवर्णसंधी आहे. इयत्ता १० वी , १२ वी, पदवीधारक, डिप्लोमा मॅकनीकल, एम.बी.ए, बी. ई. मॅकेनिकल ट्रेड अर्हता असलेले तरूण या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करणे आवश्यक आहे. सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉग-इन करून अॅप्लाय करावा. उमेदवारांनी नांव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यात मुलाखतीसाठी हजर रहावे. तसेच विभागाच्या
www.mahaswayam.gov.in/www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी देखिल करुन घ्यावी.
याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते संध्या ६.१५ या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७ – २९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहन ही श्री.रिसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






