जळगाव :- चोरीची मोटर सायकल घेणाऱ्यास LCB स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपी फारुख हुस्नोउद्दीन काझी वय २९ रा. मुल्लावाडा, एरंडोल ता. एरंडोल यास ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने सदरची मोटारसायकल सराईत गुन्हेगार योगेश शिवाजी दाभाडे रा.पथराड ता.भडगाव याचे कडून मोटारसायकल चोरीची आहे असे माहीत असतांना सुध्दा विकत घेतल्याची कबूली दिली आहे.
सविस्तर असे की,एम राजकुमार, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक सो, जळगाव यांनी जिल्ह्यात सध्या मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने मो.सा. चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा. श्री किसन नजन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना आदेश दिले.त्यावरुन मा.श्री किसन नजन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी स.पो.निरी. श्री. निलेश राजपुत, पो.उप. निरी. श्री. गणेश वाघमारे, पो.ह सुनिल दामोदरे, पोह महेश महाजन, पो.ह. नंदलाल पाटील, पो.ह. संदिप सावळे, पो.ना. भगवान पाटील, पो.ना.राहुल बैसाणे, पो.ना. अशोक पाटील, पो.कॉ. ईश्वर पाटील सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.
मा. श्री किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एरंडोल येथील राहणारा फारुख हुस्नोउद्दीन शेख याने चोरीची हिरो शाईन कंपनीची मोटार सायकल विकत घेतली असून त्याचे घरी असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरील पथकास त्याचा शोध घेवून पुढील योग्य ती कारवाई करण्या बाबत आदेश दिल्याने वर नमुद पथकाने आरोपी नामे फारुख हुस्नोउद्दीन काझी वय २९ रा. मुल्लावाडा, एरंडोल ता. एरंडोल यास ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने
सदरची मोटारसायकल सराईत गुन्हेगार योगेश शिवाजी दाभाडे रा. पथराड ता.भडगाव याचे कडून मोटारसायकल चोरीची आहे असे माहीत असतांना सुध्दा विकत घेतल्याची कबूली दिली असुन त्याच्या ताब्यातील जळगांव शहर पोस्टे CCTNS नं.६९०/२०२० भादंवि क.३७९ प्रमाणे या गुन्हयातील चोरीस गेलेली कि.अं. २००००/- रु. कि.ची ०१ मोटार सायकल जप्त करुन त्यास जळगांव शहर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.
हे पण वाचा
- दुर्दैवी घटना! घरात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, एकुलत्या एक मुलाच्या हळदीच्या दिवशीच आईने घेतला जगाचा निरोप.
- एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाच्या अडीच लाखांच्या दागिन्यांवर एस.टी.चालकाचा डल्ला, पोलिसी खाक्यानंतर दिली कबुली.
- धक्कादायक! प्रियकराशी बोलताना अडीच वर्षांची चिमुकली व्यत्यय अन् त्रास द्यायची म्हणून संतापलेल्या आईने निष्पाप लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्……
- भीषण अपघात! दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली 11 जणांचा मृत्यू,20 हून अधिक प्रवासी जखमी; मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत.
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.