पाचोरा : येथील पोलिसानेच आपल्या ‘कस्टडी’तील मुद्देमालावर डल्ला मारला आहे. त्याने सोने, चांदीचे दागिने आणि १२ लाखांची रक्कम घेत पोबारा केला आहे. याबाबत हेकॉ. यशवंत भिका घोरसे (५२, रा. पाचोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाचोरा पोलिस ठाण्यात यशवंत घोरसे हा कार्यरत होता. मुद्देमाल कारकून म्हणून त्याच्याकडे जबाबदारी होती. कस्टडीत असलेल्या १०२.९३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६.४६४ किलोग्रॅम चांदीचे दागिने व १२ लाख ३७ हजार ५७७ रु. रक्कम घेत संशयित पसार झाला.
दरम्यान, यशवंतचा भाऊ सुनील घोरसे याने या मुद्देमालापैकी ७३.६३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६.४६४ किग्रॅ चांदीचे दागिने व ६ लाख ८५ हजार रुपये असा मुद्देमाल पोलिसांना परत केला आहे. अद्यापही यशवंत याच्याकडे २९.३० ग्रॅम सोन्याचे दागिने व ५ लाख ५२ हजार ५७७ रुपये घेणे बाकी आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्या फिर्यादीवरून यशवंतविरुद्ध १३ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम