दुदैवी दुर्घटना! सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याची बोट तलावात पलटल्यानं 10 विद्यार्थ्यांसह 15 जणांचा मृत्यू

Spread the love

वडोदरा:- गुजरातच्या वडोदऱ्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन शिक्षकांसह 12 विद्यार्थी असा एकूण पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. हरणी तलावात बोट पलटल्यानं ही दुर्घटना घडली आहे. हे विद्यार्थी शाळेच्या ट्रिपसाठी गेले होते.

एकानंही घातलं नव्हतं लाईफ जॅकेट

वडोदरा इथल्या ‘न्यू सनराईज’ शाळेतील विद्यार्थी आज सकाळी हरणी वॉटर पार्क आणि तलावाच्या सहलीसाठी गेले होते. दुपारी इथल्या तलावात नौकाविहार सुरू असताना अचानक नौका उलटली. यावेळी एकाही मुलानं आणि शिक्षकांनी लाइफ जॅकेट घातलेलं नव्हतं. त्यामुळं नौका उलटताच सर्वजण बुडाले.

क्षमतेपेक्षा अधिक जण बसले होते

या घटनेची माहिती कळताच बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत 12 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. तसेच दोन शिक्षकांचाही मृत्यू झाला. मात्र, बचावपथकाला एकूण 12 जणांना वाचविण्यात यश आलं आहे. नौकेत 16 पर्यटकांना बसण्याची परवानगी असताना 27 जण बसले होते, असे जिल्हाधिकारी ए.बी. गौर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

वडोदरा जिल्ह्यातील हरणी तलावात नौकाविहार करत असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये 12 शालेय विद्यार्थ्यांचा आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी काहीजण बेपत्ता आहेत. तर अन्य १३ विद्यार्थ्यांना आणि दोन शिक्षकांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शोक व्यक्त केला आहे. 

10 ते 11 विद्यार्थ्यांना काढलं बाहेर

अग्निशमन दलाच्या 6 टीम घटनास्थळी कार्यरत आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 10 ते 12 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी अधिकारी हजर असून बचावकार्य सुरू आहे.

विरोधकांचा प्रशासनावर आरोप

वाचलेल्या 7 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी विरोधकांनी प्रशासनवर आरोप केला आहे की, जेव्हा लहान मुलं बोटीवर चढले होते. त्यावेळी त्यांनी लाईफ जॅकेट घातले नाही हीच मोठी चूक झाली आहे. या बोटीची क्षमता फक्त 15 जणांची होती. पण या बोटीवर 27 जण हजर होते. मृतक शिक्षकांची ओळख छाया पटेल आणि फाल्गुनी सुरती अशी झाली आहे. एनडीआरएफचे जवान सुद्धा घटनास्थळी मदतकार्यात सामील झाले आहे.

गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा या घटनेत मृत्यू झाला. त्याबद्दल प्रशासनाने सहवेदना व्यक्त केली आहे. या घटनेत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन ऋषिकेश पटेल यांनी दिलं.

टीम झुंजार