सर्वात कमी दिवसात निकाल अमळनेर कोर्टात इतिहासात 5 महिन्यात शिक्षा झाली
अमळनेर :- अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील आरोपीस अमळनेर सत्र न्यायालयाने २० वर्षांची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.चोपडा येथील चुंचाळे येथील ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग (कोळी) (वय ४२) याने २६ ऑगस्ट २०२३ ला दुपारी एकाच्या सुमारास आठ वर्षांची मुलगी तिच्या भावासोबत खेळत असताना तिला तंबाखूची पुडी आणण्याच्या बहाण्याने बोलावून तिला व स्वतः विवस्त्र होऊन तिच्याशी अश्लील चाळे करून अत्याचार केला. त्याचवेळी आरोपी ज्ञानेश्वर याचा मुलगा घरी आला आणि दरवाजा ठोठावू लागला. आरोपीने त्यावेळी पीडितेच्या तोंडावर हात ठेवला. मात्र मुलगा जोरात दरवाजा ठोठावू लागल्याने त्याने दरवाजा उघडला.
ही संधी साधत पीडितेने तेथून पळ काढला आणि आपल्या आजीला हकीकत सांगितली. आजीने तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्याला अटक देखील करण्यात आली होती. सहाययक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी जलद तपास करून अवघ्या महिन्यात दोषारोप पत्र दाखल केले. या संवेदनशील घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असल्यामुळे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सरकारी वकील ॲड. किशोर बागूल यांना विशेष पत्र देऊन खटला जलद चालविण्याची मागणी केली होती. त्यावर ॲड. बागूल यांनी न्यायालयला पत्र देऊन विनंती केली. न्या. पी. आर. चौधरी यांनी दखल घेत खटला वेगात चालवला. अवघ्या पाच महिन्यात निकाल दिला.
चेंबरमध्ये नोंदविली पीडितेची साक्ष
न्यायाधीशांनी पीडितेची साक्ष न्याय कक्षात न घेता तिची भीती काढण्यासाठी स्वतःच्या चेंबरमध्ये काळा कोट काढून घेतला. सरकारी वकील व आरोपीचे वकील यांचेही काळे कोट काढण्यात आले होते. तिला मनातली भीती काढत तिच्या आई समक्ष पोस्को कायद्यांतर्गत पीडितेची साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी दोन महिला वकील देखील हजर होत्या….
असे कलम, अशी शिक्षा
या खटल्यात सरकारी वकील ॲड. किशोर बागूल (मंगरुळकर) यांनी आठ साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. न्या. पी. आर. चौधरी यांनी फिर्यादी, पीडिता, वैद्यकीय अधिकारी व तपासाधिकारी संतोष चव्हाण यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी ज्ञानेश्वर यास बालकांच्या लैंगिक शोषण कायदा २०१२ च्या कलम ४ नुसार २० वर्षांची सक्षम कारावासाची शिक्षा. कलम ८ प्रमाणे ५ वर्षे सक्षम कारावास, कलम १२ प्रमाणे एक वर्षे शिक्षा सुनावली. घटनेपासून आरोपी जिल्हा कारागृहातच होता. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे, पोलिस कर्मचारी हिरालाल पाटील, सतीश भोई, राहुल रणधीर, नितीन कापडणे यांनी काम पाहिले.
हे पण वाचा
- धक्कादायक! शिक्षण संस्थेत नोकरी सुरू ठेवण्यासाठी संस्था चालकाचा शिक्षिकेवर गेल्या १० वर्षापासून वारंवार बलात्कार.
- पत्नीने प्रियकर व त्याच्या मित्रास २० हजार रुपये देवून पतीस संपविले, शक्तिवर्धक औषधाच्या ओव्हरडोसने मृत्यू झाल्याचा केला बनाव, पण तिच्या भावाने केला भंडाफोड.
- VIDEO : नवऱ्यांच्या त्रासाला कंटाळून दोन बायका इन्स्टावर पडल्या एकमेकांच्या प्रेमात; पळून जाऊन केलं मंदितरात लग्न.
- माझ्या आयुष्यात पाच ते सहा महिन्यात जे घडलं आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडून आयुष्य संपवत आहे; सोशल मीडियावर पोस्ट करत एकतर्फी प्रेमातून तरुणाने संपवलं जीवन.
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार