झुंजार प्रतिनिधी।धरणगाव(योगेश पाटील)
धरणगाव:- पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे मा.प्रकल्प अधिकारी सौ.विनिता सोनवणे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मा.सुभाष वायदंडे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र चव्हाण उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पुरोगामी संघर्ष परिषद व जिल्हाध्यक्ष विक्रम चव्हाण तसेच धनलाल चव्हाण व दिनेश पवार आदी सदस्य यांनी मा प्रकल्प अधिकारी सौ.विनिता सोनवणे यांना शहरी भागातील घरकुल योजना व ८अ उतारा आणि इतर कागदपत्र
मिळण्याबाबत तसेच स्वाभिमान सबलीकरण योजना तात्काळ आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्या करिता व काही आदिवासी योजनांमधील जाचक अटी शिथिल करण्याबाबत निवेदन देण्यात आले. त्याच प्रमाणे शहरी घरकुल योजना लवकरात लवकर लागू करण्यात यावी अशी मागणी करून मा.प्रकल्प अधिकारी यांना निवेदनाची प्रत सादर करण्यात आली.