खळबळजनक बातमी ! जळगाव पुन्हा हादरले; सलग दुसऱ्या दिवशी खून

Spread the love

जळगाव : शहरातील समतानगरात झालेल्या तरुणाच्या खुनाची घटना ताजी असतानाच आणखी एका खुनाने जळगाव शहर हादरले आहे. शिवाजीनगर हुडको परिसरातील तरुणाचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नरेश आनंदा सोनवणे (वय-३५) असे मयत तरुणाचे आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड हे पथकासह पोहचले आहेत. खून कशामुळे झाला, कुणी केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी चॉपरने वार केल्याने खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टीम झुंजार