प्रतिनिधी | एरंडोल
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओबीसी समाज व तेली समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा तालुका व शहर तेली समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेली समाजाची माफी मागावी अन्यथा समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तेली समाजाच्यावतीने तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी नसल्याचे बेजबाबदार वक्तव्य केले आहे.
राहुल गांधी यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच नव्हे तर संपूर्ण तेली समाजाचा अपमान केला आहे. समाजाच्यावतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आला. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान झाला असून, त्यांचे विरोधात गुन्हा नोंदवण्यात येऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह संपूर्ण तेली समाजाची माफी मागावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी समाजबांधवांनी राहुल गांधींच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. यावेळी तेली समाजाचे विभागीय कार्याध्यक्ष अशोक चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौधरी, शिवसेनेचे शहरप्रमुख तथा जिल्हा कार्याध्यक्ष आनंदा चौधरी, माजी उपनगराध्यक्ष बबलू चौधरी, संजय चौधरी, संताजी ब्रिगेडचे अध्यक्ष गोरख चौधरी, गुलाब चौधरी, सुनील चौधरी यांसह पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा