रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील घटना, परिसराला छावणीचं स्वरुप.
रावेर :- जळगावजिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. घटनेनं खळबळ उडाली आहे. जळगावातल्या रावेर तालुक्यातील ऐनपूर गावात तुफान राडा झाला आहे. दोन गटात हाणामारी झाली. नंतर दगडफेकही करण्यात आली. या घटनेत दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चार ते पाच जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील ऐनपूर गावात ही घटना घडली आहे, पैशांच्या देवाण-घेवाणीतून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. पैशांच्या देवाण -घेवाणीतून दोन गटात वाद झाला. वाद वाढल्यानं हाणामारीला सुरुवात झाली, आणि त्यानंतर दगडफेक करण्यात आली. या घटनेत दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चार ते पाच जण जखमी झाले आहेत. गावात तणावपूर्ण शांतता असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांच्यासह आरसीपी व दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सद्यास्थितीमध्ये गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाला छावणीचं स्वरुप आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






