पनवेल :- हैदराबाद येथील बहिणीच्या घरी जाण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. याप्रकरणी पनवेल येथील एका २८ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० जानेवारी रोजी घडली. पीडित महिला कोलकात्यातील कोलकात्यातील आपल्या मूळ गेली असता तेथील पोलीस ठाण्यात तक्रार पतीविरोधात तक्रार नोंदवली. हे प्रकरण कोलकात्या पोलिसांनी पनवेल पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे.मजान सिद्दीकी गाझी (वय, २८) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी हा गेल्या काही दिवसांपासून पत्नी अमीना खातून ऊर्फ अमीन बीबी रमजान गाझीला (वय, २८) आपल्यासोबत हैद्राबादला येण्यास आणि काही दिवस राहण्यास भाग पाडत होता. मात्र, तिने हैद्राबादला जाण्यास नकार होता. यामुळे १९ जानेवारी रोजी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर ती झोपी गेल्यानंतर आरोपीने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. या घटनेनंतर तिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.यानंतर पीडिता कोलकात्यातील आपल्या मूळ गावी गेली, जिथे तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
तिने कोलकात्यात एफआयआर दाखल केला जो रविवारी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. तिथल्या पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून झिरो नंबरवर एफआयआर नोंदवला आणि नंतर तो इथे ट्रान्सफर केला. ती तिथेच असल्याने तिच्या जळालेल्या जखमांचे गांभीर्य आणि अशा अवस्थेत तिने तिथपर्यंत कसा प्रवास केला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही,’ अशी माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश शेळकर यांनी दिली.गाझी आणि अमीना यांना तीन मुले असून ते पनवेल तालुक्यातील वावंजे येथील खैरणे गावातील रिझवान कंपनीजवळ गेल्या तीन महिन्यांपासून राहत आहेत. पती मजूर होता, तर पत्नी एका कंपनीत काम करत होती. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.