VIDEO: सोशल मीडियावर तरुणांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन्ही गट एकमेकांना चोप देत असल्याचे दिसत आहे. एका मुलाने एका तरुणीला चुकीचा मेसेज पाठवला होता. त्यामुळे काही मुलांना राग अनावर झाला आणि त्यांनी मेसेज करणाऱ्या मुलासह इतरांना बेदम चोप दिला.समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भररस्त्यात दोन गट भिडले आहेत. काहीजण हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती करत आहेत. भांडण करणारी मुले ही 15 ते 20 वयोगटातील असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे याची माहिती समजू शकलेली नाही.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी व्हिडिओ पाहुन आनंद झाला असे विधान केले आहे. हा हा व्हिडिओ Arhant Shelby या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले की, ‘मुलांनी मुलींना मेसेज करू नये नाहीतर तुमचीही अशी अवस्था होऊ शकते.’ दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटले की “ग्रुप चॅटिंग सुरु होती का? सगळी मुलं सोबत भांडायला कशी आली? आणखी एकाने म्हटले की, ही मुलं भविष्यातील गुंड आहेत, त्यांना चोप दिला पाहिजे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






