महाराजगंज :(उत्तर प्रदेश) :- येथे नौतवान येथे गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा लावण्याची घटना घडली आहे. खासगी शाळेतील एका 45 वर्षाच्या शिक्षकाने इयत्ता सहावीत विद्यार्थिनीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी शिक्षकाच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद नोंदवली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराजगंज येथे नौतवान येथील एका कन्या पूर्व माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेतील 45 वर्षाच्या शिक्षकाने पळवून नेले आहे.
सदर घटना 8 फेब्रुवारीची असून मुलगी नेहमी प्रमाणे शाळेत गेली मात्र घरी परतली नाही. त्याच दिवसापासून शाळेतील शिक्षक देखील फरार आहे. अद्याप शिक्षक आणि विद्यार्थिनी फरार आहे. हा शिक्षक नेपाळचा रहिवासी आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला असून संशयाच्या आधारे शिक्षकावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






