यावल :- यावल तालुक्यातील शिरागड येथील अविवाहित तरुण शेतकऱ्याची आपल्या शेताच्या बांधावर गळफास घेवुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , महेश कैलास सोळ्के वय-२५ वर्ष रा.शिरागड ता. यावल या अविवाहित तरुण शेतकऱ्यांने १६ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी १o.३० वाजेच्या सुमारास आपल्या गट क्रमांक- ११८ या शेताच्या बांधावर असलेल्या निंबाच्या झाडावर दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.
या बाबत शिरागड गावातील पोलीस पाटील सुधाकर नारायण सोळुंके यांनी खबर दिल्याने यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक हरिष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






