कोटा :- (राजस्थान) येथे एका 16 वर्षीय तरुणीवर कोचिंग इन्स्टिट्यूटमधल्या चार विद्यार्थ्यांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर कोटात एकच खळबळ उडाली आहे.आरोपी मुले हे 18 – 19 वयोगटातील आहे. पीडित मुलगी ही राजस्थान येथील रहिवासी नाही. आरोपींनी राहत्या भाड्याच्या खोलीत पीडित मुलीवर बलात्कार केला, ही घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली. पीडित मुलगी 5मे रोजी होणाऱ्या NEET ची तयारी करण्यासाठी आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोटा येथे आली होती. पीडितेला एकत्र अभ्यास करण्याच्या बहाण्याने बोलावून घेतलं. आरोपी मुलांनी खोलीत बोलावून तिच्याशी अभ्यासा विषयी बोलू लागले. थोड्यावेळाने तिला बळजबरीने पीडित मुलीवर चौघांनी मिळून सामुहिक बलात्कार केला.
या प्रकरणी मुलीने 13 फेब्रुवारी रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.पीडितेने तक्रारीत सांगितले की, आरोपींशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पोक्सो कायदा आणि संबंधित आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला, ज्यामुळे चार संशयितांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास कोटो सेंट्रल पोलिस करत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






