छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळा लोकार्पण सोहळा,हजारो युवक,शिव भक्त व महिलांची उपस्थिती.
प्रतिनिधी l पारोळा
स्वतःसाठी प्रत्येक जण हा जगतो. पण दुसऱ्यासाठी जगणं हे अतिशय मोलाचे ठरते. छत्रपती शिवाजी राजे यांनी आपले आयुष्य लोककल्याणासाठी व धर्म रक्षणासाठी खर्ची घातली म्हणून त्यांच्या पुतळ्यापासून स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्या साठी जगण्याची प्रेरणा देतो असे विचार आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केले.
शेतकरी सहकारी संघ आवारात छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्याचे लोकार्पण व सुशुभीकरण उद्घाटन आमदार चिमणराव पाटील व उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील शालिक गायकवाड, दयाराम पाटील, राजेंद्र चौधरी सह विविध मान्यवर उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले की पंधरा वर्षे आमदारकी च्या काळात श्री शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण सोहळ्याचे भाग्य मला मिळाले त्याचे सर्वाधिक मोठे समाधान आज प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या झालेल्या विविध पंचवार्षिक मधील विकास निधी व आताच्या अडीच वर्षातील विकास निधीची बेरीज केली असता या अडीच वर्षाचा कार्यकाळातील निधी हा सर्वाधिक असल्याचा दावा करून पक्षांतर बदलाचा निर्णय घेतला नसता. तर हा विकासाचा वारू मतदारसंघात उधळला नसता अशी भावना देखील आ पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
उपाध्यक्ष अमोल पाटील म्हणाले की अश्वरूढ पुतळ्याची शिवप्रेमींकडून मागणी होती. तिची पूर्तता केल्याचे आज आम्हाला मोठा आंनद व समाधान आहे. मतदार संघातील विविध विकास कामे संताजी जगनाडे महाराज पुतळा ज्योतिरावराव फुले पुतळा यांचे लोकार्पण झाले आहे.तर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज पुतळा यांचा लोकार्पण देखील लवकरच होणार आहे. सर्वसमावेशक पुतळा लोकार्पण मुळे सर्वसमभाव विचारधारा रूढ होण्यास महत्त्वाची मदत होणार आहे.
दरम्यान आझाद चौक येथून या लोकार्पण सोहळा निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे सजीव देखावा शोभायात्रा नासिक ढोल लेझीम पथक व बँड द्वारे काढण्यात आली. शोभा यात्रेने शहराचे लक्ष वेधून घेतले होते. लोकअर्पण सोहळा प्रसंगी झालेली विद्युत रोषणाई फटाक्यांची आतिषबाजी ही एकमेव द्वितीय ठरली यावेळी नागरिक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस निरीक्षक सुनील पवार सह पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त यावेळी ठेवला होता.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम