यावल : शहराच्या बाहेर चोपडा रस्त्यावर महाजन पेट्रोल पंपाजवळ ट्रकच्या ताडपत्रीचा दोर बांधताना तोल जाऊन पडल्याने चालक जागीच ठार झाला.ही दुर्घटना रविवारी रात्री नऊ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. व मयत चालकाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. मयत हा मध्य प्रदेशातील इंदोर येथील रहिवासी असून त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.
यावल शहराबाहेर चोपडा रस्त्यावर महाजन पेट्रोल पंप आहे.या पेट्रोल पंपा जवळ ट्रक क्रमांक एम.पी.09 एच. जी. 2489 थांबवून चालक संतोष,रा. इंदोर मध्यप्रदेश हा ट्रक वरील ताडपत्रीला दोर बांधत होता दरम्यान ताडपत्री बाधत असतांना अचानक त्याचा तोल गेला आणि तो सरळ रोडावर कोसळला. त्यात त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. या दुर्घटनेची माहिती आरडा ओरड करून ट्रक वरील क्लीनर उपेंद्र राजकुमार चव्हाण याने नागरिकांना दिली.
तेव्हा घटनास्थळी अयाज खान, इम्तियाज शेख सह नागरिक दाखल झाले व त्यांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हे पथकासह दाखल झाले व मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मयत संतोष याचे कुटुंबीय इंदोर मध्यप्रदेश येथे राहत असून त्यांच्या कुटुंबाला या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे.रात्री उशिरापर्यंत यावल पोलिसात या दुर्घटने संदर्भात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा