पतीवरील बलात्काराचा गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेवरच केला तीन जणांनी सामूहिक बलात्कार, नतंर पिडीतेस दिले पेटवून.

Spread the love

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) – चौतीस वर्षीय गर्भवतीवर तिघांनी बलात्कार करून तिला पेटविल्याची धक्कादायक घटना मोरेना जिल्ह्यात घडली. या घटनेत महिला सुमारे ८० टक्के भाजली असून तिच्यावर ग्वाल्हेरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तिची मृत्युशी झुंज सुरू आहे.

मध्य प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीवर दुसऱ्या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी पीडितेच्या पतीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. सध्या तो जामिनावर आहे. या प्रकरणात तडजोड करण्यासाठी ती या महिलेच्या गावी गेली होती.

त्यावेळी, दुसऱ्या महिलेच्या घरात आधीपासूनच उपस्थित असलेल्या तीन जणांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या तिघांनी तिच्यावर इंधन टाकून तिला पेटविले. या आगीत ती गंभीररित्या जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ पीडितेच्या पतीने पोलिसांना दिला.

पीडितेचा जबाब

दरम्यान, पीडितेने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब दिला असून पोलिसांनी मात्र अद्याप तिचा जबाब नोंदविलेला नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार