Viral Video : नवरा-बायकोमधील प्रेम, वाद कायमच पहायला मिळत असतो. मात्र अनेकदा वाद एवढा वाढतो की थेट घटस्फोट किंवा कोर्टात पोहोचतो. सामंजस्य दाखवत दोघांनाही कोर्टाचं ऐकून निर्णय दिला जातो. मात्र काही वेळेस परिस्थिती हाताबाहेर जाते. कोर्ट रुममध्येही भांडण, वाद थांबत नाहीत. असाच काहीसा प्रकार घडलेला समोर आला. नवरा बायकोचा वाद कोर्ट रुमपर्यंत गेला मात्र ते तिथे जाऊनही भांडत राहिले आणि शेवटी त्यांना थांबवायला पोलिसांनाच बोलवावं लागलं.
नवरा बायकोचा वाद कोर्टमध्ये गेल्याचा एक प्रकार समोर आलाय. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. बायको तर नवऱ्यावर हातही उचलताना दिसून आली.नवरा बायकोच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कोर्ट रुम दिसत आहे. कोर्टमध्ये भरपूर गर्दी आहे. दोघांच्याही वादावर सुनावणी सुरु असते मात्र अचानक बायकोला नवऱ्याच राग येतो आणि ती त्याला भर कोर्टातच मारायला लागते.
ती त्याच्या थोबाडीत मारते त्याला चापट मारते. शेवटी त्यांचा वाढलेला वाद पाहून पोलिसांना बोलवावं लागतं. @gharkekalesh नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 22 सेकंदांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसत आहेत.दरम्यान, प्रत्येक नवरा बायकोमध्ये वाद हा होतच असतो. मात्र काही प्रकरणांत हा वाद कोर्टात जातो. तिथेही एकमेकांचे आरोप ऐकून आणि कोर्टाच्या सुनावणीला ऐकून घेतानाही काही भांडत राहतात.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






