जळगाव :- पिण्याचे पाणी भरण्यासाठी ईलेक्ट्रीक मोटार चालू करतांना विजेच्या धक्का बसल्याने ३० वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे दिसून आले. संदीप हिरामण भालेराव वय ३८ रा. वाघ नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील वाघ नगर परिसरात संदीप भालेराव हा तरूण आपल्या आई, पत्नी, दोन मुलांसह वास्तव्याला होता. सेक्यूरीटी गार्डची खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता वाघ नगर परिसरात पिण्याचे पाण्याचे नळ आलेले होते. त्यावेळी घरी संदीप व त्यांची आई हे घरी होते. संदीप याने पिण्याचे पाणी भरण्यासाठी ईलक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जबर धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. दरम्यान संदीपच्या वडीलांचे अधीच निधन झालेले आहे त्यात आई दिव्यांग आहे. त्यामुळे घरातील कर्ता पुरूष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






