3 महिन्यापूर्वीच झालं लग्न,२५ वर्षीय पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू; हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने केली आत्महत्या.

Spread the love

गाझियाबाद :- मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद शहरात राहणाऱ्या अभिषेक अहलुवालिया याचे अंजली नावाच्या तरुणीसोबत लग्न झाले होते. नवीन नवीन संसार फुलत असतााच नियतीच्या मनात काही वेगळेच होते. गाझियाबादमध्ये एका तरुण जोडप्याचा मृत्यू झाला आहे. तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.तर नवऱ्याचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने बायकोने आत्महत्या केली आहे. या घटनेने कुटुंबियावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि अंजली असे मृत्यू झालेल्यांची नावे आहे. अभिषेक हा २५ वर्षांचा होता. त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर नवऱ्याचा मृत्यूचा धक्का सहन झाल्याने तिनेदेखील सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. अभिषेक आणि अंजलीचे लग्न ३० नोव्हेंबरला झाले होते. हे दोघेही सोमवारी दिल्लीतील प्राणिसंग्रहालयात फिरायला गेले होते. तेथेच अभिषेकच्या छातीत दुखायला लागले. त्यामुळे अंजनीने मित्रांना बोलवून त्याला रुग्णालयात दाखल केले.

यादरम्यान अभिषेकचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अभिषेकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाले असल्याचे सांगितले.नवऱ्याचा मृत्यू झाल्याचा धक्का अंजलीला सहन झाला नाही. त्यामुळे अंजलीनेदेखील टोकाचे पाऊल उचलले. अंजलीने सातव्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारली आहे. यात अंजली गंभीर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दुर्दैवाने तिचादेखील मृत्यू झाला आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकचा मृत्यू झाल्याने अंजली खूप जास्त दुःखात होती. त्यानंतर अभिषेक पार्थक घरी आणल्यानंतर अंजली उठली आणि बाल्कनीतून उडी मारली. यात तिचा मृत्यू झाला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार