2 मुलांची आई, नवऱ्यासह प्रियकरासोबत प्रेमसंबंध शेवटी महिलेसोबत जे घडलं ते धक्कादायक.

Spread the love

अंबरनाथ : अंबरनाथच्या सर्वोदय नगर परिसरात रमेश झा हे पत्नी सुमनदेवी आणि आपल्या दोन मुलांसह राहत होते. यापूर्वी त्यांची पत्नी आपल्या दोन मुलांसह दिल्ली येथे वास्तव्यास होती. मात्र दोन वर्षांपूर्वी ती आपल्या मुलांना घेऊन अंबरनाथ येथे आपल्या पतीसोबत राहायला आली.दिल्लीत असताना सुमनदेवी हिचे धर्मवीर गुप्ता या व्यक्तीसोबत प्रेम संबंध निर्माण झाले. मात्र सुमनदेवी प्रियकराला सोडून अंबरनाथमध्ये पतीकडे राहायला आली. नवऱ्यासह बॉयफ्रेंडशीही संबंध ठेवणाऱ्या या महिलेसोबत शेवटी धक्कादायक घडलं.

सुमन देवीला प्रियकर धर्मवीर पुन्हा दिल्लीला येण्यासाठी वारंवार तगादा लावत होता. मात्र पतीला सोडून येऊ शकत नाही असं तिनं धर्मवीरला सांगितलं. त्यामुळे त्यानं रमेशची हत्या करण्याचा प्लॅन केला. त्यासाठी त्याने अंबरनाथ गाठलं. धर्मवीर आणि त्याचा साथीदार हा एका लॉजमध्ये राहू लागले. सुमनदेवीही लॉजमध्ये जाऊन धर्मवीरला भेटत होती. इथं त्यांनी रमेशचा याचा काटा कसा काढायचा याचा प्लॅन केला.25 फेब्रुवारी रोजी रमेश हा अंबरनाथ एमआयडीसीमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास सायकलवरून कामाला निघाला होता.

तेव्हा धर्मवीर आणि त्याच्या साथीदाराने त्याच्यावर चाकूने हल्ला करत त्याची हत्या केली. अंबरनाथ पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला. पोलिसांना हत्या झालेल्या ठिकाणी दोन व्यक्ती पळून जात असल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलं. त्याचबरोबर इतर ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांनी धर्मवीर गुप्ता आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. यात एका अल्पवयीन आरोपीचा देखील समावेश आहे .या आरोपींना अटक केल्यानंतर सुमनदेवीचा या हत्येच्या कटात सहभाग असल्याचं आरोपींनी स्पष्ट केलं. त्यानंतर तिला देखील अंबरनाथ पोलिसांनी अटक केली.दरम्यान याप्रकरणी आरोपींना 5 दिवसापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ काळसकर यांनी सांगितलं.

हे पण वाचा

टीम झुंजार