अमळनेर :- तालुक्यातील मारवड येथील पोलीस स्थानकाच्या हद्दीतील दाखल गुन्ह्यात तसेच अमळनेर स्थानकाच्या लॉकअपमध्ये असलेला संशयित आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत वय ४९ राहणार प्रगणे डांगरी ता अमळनेर यास फिर्यादीने दिलेल्या लेखी तक्रार नुसार चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते ,न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडीत रवानगी केली होती मात्र संशयित आरोपीने अमळनेर येथील पोलीस कोठडीत शौचालयात गळफास घेऊन जीवन यात्रा संपविल्याची घटना आज घडली असून
यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मारवड पोलीस स्थानकाच्या अंतर्गत झालेल्या चोरीच्या प्रकरणी घनश्याम भाऊलाल कुमावत या संशयिताला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली असून तो सध्या अमळनेर पोलीस स्थानकाच्या कोठडीत होता. त्याने रात्री गळफास लाऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.काही वेळातच ही माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ त्याला रूग्णालयात दाखल केले.
मात्र, तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आले.पोलीस कोठडीत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले संबंधीत व्यक्तीने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला ? याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज दिनांक ९ रोजी पहाटे निदर्शनास येताच जिल्हा पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






