तहसीलदार कार्यालयातील आवारातील अवैध गौण खनिज वाहतुकीचे पकडलेले वाहन तिघांनी पळवलेे, यावल पोलिसात गुन्हा दाखल

Spread the love

यावल : तालुक्यातील किनगाव येथे रविवारी रात्री अवैध गौण खनिज वाहतुक करणारे वाहन महसुलच्या गस्ती पथकाने पकडले होते व ते वाहन पंचनामा करून तहसिल कार्यालयात लावले होते दरम्यान मध्यरात्री नंतर सदरील वाहन तीन जणांनी तहसिल कार्यालयात येवुन मुख्य गेटचे कुलूप तोडून तसेच सीसीटीव्ही कॅमेर फोडून वाहन पळवुन नेले ही घटना सकाळी उघडकीस आली असुन या प्रकरणी यावल पाोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किनगाव ता.यावल परिसरात दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी वसीम तडवी, शरीफ तडवी, ईश्वर कोळी, मिलिंद कुरकुरे, कोतवाल समीर तडवी हे महसूल विभागाचे अवैद्य गौण खनिज वाहतुक विरोधी पथक गस्ती वर होते त्यांना रात्री अवैध गौण खनिज वाहतुक करतांना अशोक लेलँड कंपनीचे विना क्रमांकाचे वाहन मिळून आले. तेव्हा पथकाने तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांना माहिती दिली व सदर वाहन पंचनामा करून किनगाव येथुन यावल येथील तहसिल कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले

दरम्यान सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भूषण विठ्ठल कोळी, विठ्ठल भाऊलाल कोळी व स्वप्नील तुषार कोळी यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात मुख्य गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीचा कॅमेऱ्या पैकी एक कॅमेरा फोडून टाकला नंतर आवारात लावलेले सदर विना क्रमांकाचे वाहन पळवून नेले.

हा प्रकार सकाळी निर्दशनास आला तेव्हा या प्रकरणी किनगाव येथील कोतवाल गणेश रमेश वराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात भूषण कोळी, स्वप्नील कोळी व विठ्ठल कोळी ( सर्व रा. रिधूर, ता. जळगाव) यांच्या विरोधात भादंवि कलम ३७९, ३४१, ४२२ तसेच गौणखनिज कायद्यातील कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासीम तडवी हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार