फेसबुकवर झाली मैत्री,विश्वासाचा गैरफायदा घेत शीतपेयात गुंगीचे औषधी टाकून केला शिक्षिकेवर बलात्कार, मोबाईलमध्ये काढले अश्लील फोटो…..

Spread the love

नागपूर : फेसबुकवरून झालेल्या मैत्रीतून शिक्षिकेने युवकावर विश्वास ठेवला. त्याला मित्र समजून त्याच्यासोबत एका नोकरीच्या मुलाखतीला गेली. मात्र, त्याने विश्वासाचा गैरफायदा घेत शिक्षिकेच्या शितपेयात गुंगीकारक औषधी मिसळून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शुद्धीवर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी मित्राविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

कृणाल गजबे (३०) रा. दाभा असे त्या आरोपीचे नाव आहे. तो इंदोरच्या एका कंपनीत काम करतो. तर पीडित युवती उच्चशिक्षित असून एका शिकवणी वर्गात शिक्षिका म्हणून नोकरी करते. सोबतच ती शासकीय नोकरीसाठी प्रयत्नशील होती. दरम्यान २०१८ मध्ये कृणालने तिच्याशी फेसबुकवर मैत्री केली. ओळख वाढत गेल्याने दोघांनीही एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले आणि संवाद सुरू झाला. कृणालने मोठमोठ्या गोष्टी सांगितल्याने पीडित शिक्षिकेचा त्याच्यावर विश्वास बसला. दरम्यान शासकीय नोकरी लावून देण्याची सुध्दा त्याने बतावणी केली.

पीडितेचा विश्वास पुन्हा बळावला. तेव्हा तो औरंगाबदला नोकरी करीत होता. त्याने मुलाखतीला जायच्या नावाखाली तिला औरंगाबदला बोलाविले. नोकरी मिळत असल्याने ती सुध्दा कुठलाच विचार न करता औरंगाबादला गेली. तो तिला लोणावळा येथे घेऊन गेला. शितपेयात गुंगीचे औषधी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याने मोबाईलमध्ये काही छायाचित्रही काढले होते. तो अश्लील छायाचित्र समाजमाध्यमावर टाकण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण करीत होता.

त्याने तिला औरंगाबादला राहायला बाध्य केले. आता नोकरीचा प्रश्न नव्हे तर तिच्यासमोर आयुष्याचा प्रश्न उभा झाला होता. नंतर त्याने इंदोरच्या कंपनीत काम सुरू केले. तिथे सुध्दा तो तरुणीला घेऊन गेला. मागील पाच वर्षापासून तिला पत्नीसारखे ठेवल्यानंतर चक्क लग्नासाठी नकार दिला. या प्रकाराने व्यथीत झालेल्या तरुणीने हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपी कृणाल विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार