अमळनेर :- तालुक्यातील पिंपळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. होळीच्याच दिवशी घराला आग लागून गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घरातील कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू झाला. दिलीप नामदेव पाटील असे मयताचे नाव आहे.याबाबत असे की, अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथे कुटुंबासह वास्तव्यास असलेले दिलीप पाटील त्यांच्या पत्नी सायंकाळी दिवा लावत असतानाच घरात अचानक आग लागली आणि त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. घराचे लाकडी छत आणि घरात कापूस असल्याने सर्व घरातच आग पसरली.
दिलीप यांच्या पत्नी, मुलगा आणि नात तातडीने घराबाहेर पळाले.मात्र दिलीप यांना चक्कर आल्याने ते घरात अड कून पडले. ग्रामस्थ मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात आणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत त्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. घर आणि घरात असलेल्या किराणा दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. आगीत पाटील यांच्या पत्नी संगीता, मुलगा विकी व नात खुशी हे देखील जखमी झाले आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






