जळगाव :- तालुक्यातील नशिराबाद येथील २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. जयश्री अमित महाजन (वय २२, रा.खालची आळी, नशिराबाद) असे मयत विवाहितेचे नाव असून आत्महत्यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, एकीकडे धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या महिलेच्या आत्महत्याच्या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली असून कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
याबाबत असे की, जयश्री महाजन हिचे पती अमित महाजन हे खाजगी व्यवसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, आज धुलीवंदनानिमित्त गल्लीतील मुले रंग खेळत होते तर दुसरीकडे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे जयश्री महाजन यांचे पती व सासरे हे एका धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांच्या नातेवाईक परिवारातील सदस्यांसोबत सकाळीच निघालेले होते.घरी जयश्री महाजन व त्यांची तीन वर्षांची लहान मुलगी एकटेच होत्या. त्यावेळेला त्यांनी कुठल्या तरी नैराश्याखाली येऊन गळफास घेत आत्महत्या केली.
त्यांची तीन वर्षाची लहान मुलगी रडायला लागली तेव्हा शेजाऱ्यांना आवाज आला. त्यांनी घरात डोकावून पाहिले असता ही घटना उघडकीस आली त्यांनी कुटुंबीय व नातेवाईकांना ही घटना सांगितली. दरम्यान जयश्री महाजन यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंति त्यांना मयत घोषित केले. जयश्री महाजन यांच्या पश्चात पती, लहान मुलगी, सासरे असा परिवार आहे.यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच नशिराबाद पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- टी२० विश्वविक्रम: एकाच संघाच्या ११ जणांनी गोलंदाजी करत रचला विश्वविक्रम,जगात घडले पहिल्यांदाच तर हार्दिक पांड्याच्या ६ चेंडूंत २८ धावा
- जळगावात भरदिवसा घरफोडी करणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. ३० नोहेंबर २०२४
- दुर्दैवी घटना! घरात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, एकुलत्या एक मुलाच्या हळदीच्या दिवशीच आईने घेतला जगाचा निरोप.
- एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाच्या अडीच लाखांच्या दागिन्यांवर एस.टी.चालकाचा डल्ला, पोलिसी खाक्यानंतर दिली कबुली.