मुंबई – भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा इंधन दरात वाढ झाली आहे.आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली आहे. वाढत्या महागाईने जनता होरपळून निघत आहे. आज दर वाढीने जळगावात पेट्रोल ११६ रुपयांवर गेले आहे, तर डिझेल ९९ रूपया जवळ पोहोचले आहे. देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे तब्बल 6 रुपयांची वाढ झाली आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील इंधनाचे दर
आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे 80 पैशांची तर डिझेलच्या दरात देखील 80 पैशांचीच वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 115.04 रुपये तर डिझेल 99.25 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 115.69 आणि डिझेल 98.40 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 113.42 तर डिझेल 115.09 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 114.71 आणि 97.46 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 114.96 रुपये लिटर आणि डिझेल 97.73 रुपये लिटर इतके आहे.