इंदूर (मध्य प्रदेश) :- येथील एका गावामध्ये होळीच्या दिवशी एका ३० वर्षीय तरुणीला काही महिलांनी बेदम मारहाण केल्याची आणि तिला विवस्त्र करून गावातून फिरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी कठोर कारवाई करत या तरुणीला मारहाण करून विवस्त्रावस्थेत फिरवल्याच्या आरोपाखाली चार महिलांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे होळीदिवशी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओसुद्धा बनवण्यात आला होता.
त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. याबाबत समोर येत असलेल्या माहितीनुसार पोलीस एसपी (ग्रामीण) सुनील कुमार मेहता यांनी सांगितले की, गौतमपुरा पोलीस ठाणे परिसरामधील एका गावामध्ये चार महिलांनी मिळून एका तरुणीला जबरदस्तीने घराबाहेर काढले. त्यानंतर तिला जबर मारहाण केली. या महिल्या एवढ्यावरच थांबल्याय नाहीत. त्यांनी त्या तरुणीला विवस्त्र केले. तसेच त्याच अवस्थेत तिला गावभर फिरवले. या तरुणीची विवस्त्रावस्थेत धिंड काढली जात असताना कुणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मिडियावर व्हायरल केला.
दरम्यान, या धक्कादायक प्रकाराला वाचा फुटल्यानंतर आता आरोपी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावामध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकारामुळे धक्का बसलेली पीडित तरुणी गाव सोडून तिच्या पालकांकडे गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडिता दोघेही अनुसूचित जातींमधील आहेत. घडलेली घटना गावातीलच कुणीतरी मोबाईलवर चित्रित करून सोशल मीडियावर व्हायरल केली. पोलीस आता या घटनेचं चित्रिकरण करणाऱ्याचा शोध घेत आहेत.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.