सावदा | प्रतिनिधी (प्रशांत सरवदे ):- शहरातील कोचुर रोडवरील रवींद्र बेंडाळे यांच्या शेतात मजुरांकरीता बांधलेल्या घरात काम करणाऱ्या प्रौढाचा आज सकाळी खून झाल्याचे निदर्शनास आले होते सावदा पोलिसांनी तपास चक्रे फिरवत दोन आरोपींना चार तासात अटक केल्याने त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.सविस्तर वृत्त शहरातील कोचुर रोडवर रविंद्र बेंडाळे याचे शेतात शेत मजुराकरिता बांधलेल्या घरात त्याच्याकडे काम करित असलेला सुभाराम बारेला रा. आंबळी ता. झिरण्या जि. खरगोन मध्यप्रदेश हा राहत होता.
आज दि. ३०/०३/२०२४ रोजी ०७.३०. वाजेच्या सुमारास सुभाराम बारेला हा सकाळी कामावर आला नाही म्हणुन शेत मालकाने सुभाराम याची चौकशी केली असता शेतातील घरात त्याचे डोक्यात दगड टाकुन त्याचा खुन झाल्याचे आढळुन आले त्यावरुन लोकेश बेंडाळे याचे फिर्यादीवरुन सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हेगारा विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची खुनाची माहीती मिळताच तात्काळ घटनास्थळी सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि जालिंदर पळे व पथकाने धाव घेऊन तेथील परिस्थीची पाहणी करुन तपासाची चक्रे वेगाने फिरवुन आजुबाजुच्या परीसरातील सालगडी म्हणून काम करणारे सर्व मजुरांची माहीती घेतली
त्यावरुन दोन सालगडी त्याचे कामाचे व राहण्याचे ठीकाणी मिळुन आले नाहीत त्यावरुन त्याची माहीती घेण्यास सुरवात केली असता त्यानी त्याचे मालकाकडुन सकाळीच रोजदारीचे पैस घेऊन गेल्याचे समजल्याने चार वेगवेगळी पथक निर्माण करुन सदरचे संशयित शेत मजुराचे नातेवाईक याचा शोध घेत असताना त्यातील एकाचे नातेवाईक उदळी गावाचे हद्दीत राहत असल्याचे समजले वरुन त्याठीकाणी पोलीस पथक गेले व संशयिताना वेगवेगळ्या ठीकाणावरुन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानी गुन्ह्याची कबुली देऊन घडलेली घटना सांगितली.
प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत मृत व आरोपी याच्यात झालेल्या भांडणाचे कारणावरुन आरोपी नामे सुकलाल रतन लोहारे रा.नेपानगर (म.प्र) व अर्जुन मुन्ना आवासे रा.ब-हाणपुर (म.प्र) यानी मृतास झोपेत असताना डोक्यामध्ये दगड टाकुन त्याचा खुन केल्याचे निष्पन झाले आहे. याबाबत गुन्ह्याचे कारणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधिक्षक जळगाव महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधिक्षक जळगाव अशोक नखाते, उप. विभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर उप. विभाग मुक्ताईनगर राजकुमार शिंदे, याचे मार्गदर्शनाखाली
सावदा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरिक्षक जालिंदर पळे , पोउपनि अमोल गर्जे, सफौ संजय देवरे, पोहेकॉ विनोद पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे, पोहेकॉ देवेंद्र पाटील, पोहेकॉ विनोद तडवी, पोकॉ प्रकाश जोशी, पोकॉ किरण पाटील याचे पथक तयार करुन गुन्ह्याबाबत कोणत्याही प्रकारची माहीती घटनास्थळावर उपलब्ध नसतानाही वरील प्रमाणे त्वरीत हालचाल व चौकशीकरुन चार तासाचे कालावधीत आरोपीस निष्पन केले व त्याना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला . या गुन्ह्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखा कडिल अधिकारी व पो. अंमलदार, अंगुली मुद्रा तंज्ञ, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक यांनी तपासकामी मदत केली.
हे पण वाचा
- 52 वर्षीय सासरा व त्याच्या मित्राने नवविवाहीत सुनेस १५ दिवस घरात डांबून ठेवत केला लैंगिक अत्याचार आरोपी सासरा व त्याच्या मित्र फरार.
- दोघांच्या प्रेमात ५ वर्षाच्या मुलगा होता अडथळा.! निर्दयी आई समोर प्रियकराने केली चिमुल्याची हत्या, कपड्यात बांधून मृतदेह फेकला नदीत.
- नवीन वीज मीटर बसवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने मागितली साडेचार हजाराची लाच; संशयित लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…
- दीड वर्षापासून प्रेमसंबंध, घरच्यांकडे लग्नासाठी मागणी,मुलीच्या आईने दिला सल्ला ‘आधी सेटल हो, मग लग्न कर’ रागात प्रियकराने प्रेयसीची केली हत्या अन् स्वतः ही केली आत्महत्या.
- एरंडोलला शिवसेना ठाकरे गटाला खिंडार, युवासेनेच्या जिल्हा समन्वयकांसह माजी नगरसेवकासह अनेक पदाधिका-यांचा शिंदे गटात प्रवेश.