चुरु :- 21 वर्षाच्या बहिणीला प्रेम संबंधांपासून अडवणे 30 वर्षीय भावाला अत्यंत महाग पडले आहे. भावाच्या अडवण्याने बहिणीने भावाच्या पोरीचीच केली हत्या. हि घटना राजस्थानमधील चुरु जिल्ह्यात असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या घटनेचा तपास रतनगड पोलीस करत असून जलेऊ गावात हि घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी सांगितले की, इंद्रजीत पारीकने काही दिवसांपूर्वी त्याच्या बहिणीला शेजारच्या मुलासोबत पहिले होते. यावर त्याने तिची समजूत देखील काढली असे परक्या व्यक्तीला भेटणे बोलणे चांगले नाही.
परंतु तिने भावाचे ऐकले नाही. भावाने रागावले म्हणून तोच राग मनात धरला आणि भावाचा बदला घेण्याचा निश्चय केला.भावाला धडा शिकवण्यासाठी मायाने त्याची अडीच वर्षांची मुलगी समृद्धीला संपवण्याचा मार्ग अवलंबला. संपूर्ण कुटुंब होळी खेळत होते. दरम्यान समृद्धी देखील घरासमोर होळी खेळत होती. घरात कोणी नसताना मायाने संधी पाहून घरात बांधलेल्या पाण्याच्या टाकीत बुडवून तिचा निर्घृणपणे खून केल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत टाकून घराजवळील जनावरांच्या चाऱ्याच्या परिसरात लपवून ठेवला होता.
होळी खेळता खेळता समृद्धी अचानक गायब झाल्याने सगळीकडे तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही म्हणून घरच्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना मृतदेह सापडला. शेजार्यांकडे लावलेल्या सीसीटीव्ही ही संपूर्ण बाब उघडकीस आली. मायानेच खून केल्याचे दिसून आले.संपूर्ण परिवार होळीचा आनंद घेत असताना हि घटना घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मायाला कोठडीत घेतले असून तिची चौकशी सुरु आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






