बिलासपूर (छत्तीसगड):- विवाहानंतर नवरीला मोटारीमधून घेऊन सासरी जात असताना पोलिसांना पाहून नवरी जोरजोरात ओरडू लागली. पोलिसांनी मोटार थांबवून नवरीची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.छत्तीसगडमधील एका मुलीला तिच्या भावाने शिवपुरीतील एका तरुणाला 1.30 लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. शिवपुरी येथील युवकाचे लग्न होत नसल्याने त्याने मुलीला लग्नासाठी विकत घेतले. मात्र मुलगी सासरच्या घरी येऊन तिच्या माहेरी जाण्याचा हट्ट करू लागल्याने त्यांनी तिला राजस्थानमध्ये विकण्याचा कट रचला.
ते तिला राजस्थानला घेऊन जात असताना वाटेत युवती पोलिसांना पाहून आरडाओरडा सुरू केला आणि अखेर पोलिसांनी मुलीची सुटका केली आहे.पोलिसांनी मुरैना येथील बनमोर येथील बुद्धपुरा एसएसटी चेकिंग पॉइंटवर तपासणीसाठी एक कार थांबवली. मोटारीमध्ये नवरीसह 6 जण होते. त्यानंतर नववधूने पोलिसांना सांगितलं की, साहेब, कृपया माझा जीव वाचवा. हे लोक मला विकणार आहेत. हे समजताच पोलिसांनी सर्वांना गाडीतून बाहेर काढले. नवरीने सांगितले, मूळची ओडिशाची असून, कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून छत्तीसगडमधील बिलासपूर येथे वास्तव्यास आहे.
काही दिवसांपूर्वी 26 मार्च रोजी तिच्या भावाने तिला शिवपुरी येथील रवींद्र लोधी अवघ्या 1.30 लाख रुपयांना विकले. त्यानंतर रवींद्रने मनाविरोधात लग्न केले. 10 दिवसांनंतर तिने आपल्या माहेरच्या घरी जाण्याचा हट्ट धरल्यावर तिला नजरकैदेत ठेवले. कोणाला फोन करू नये म्हणून सासरच्यांनी वधूचा फोनही तोडला. तरीही, वधू ठाम राहिली आणि तिच्या सासरच्या मंडळींना समजलं की तिला असं कोंडून जास्त काळ ठेवता येणार नाही. मग तिला राजस्थानात विकायचे असं त्यांनी ठरवलं. याबाबत भरतपूरमधील कोणाशी तरी चर्चा करण्याचं त्यांनी ठरवले.
बुधवारी सासरचे 5 जण वधूसोबत कारमध्ये चढले आणि तिला भरतपूरला घेऊन जाऊ लागले. मात्र, वधूने वाटेतच तपासणी करणाऱ्या पोलिसांना सर्व काही सांगितले.’पोलिसांनी नवरदेव रवींद्र, त्याची आई, वडील रघुपती, मेहुणा भूपेंद्र जाट, मावशी शारदा आणि दीपिका यांना अटक केली आहे. रवींद्रने पोलिसांना सांगितले की, लग्न जमत नसल्यामुळे कोणीतरी त्याला या मुलीबद्दल सांगितले. रवींद्रने मुलीच्या भावासोबत 1.30 लाख रुपयांचा करार करून वधू खरेदी केली. सध्या वधूच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वधूच्या भावालाही अटक करण्यात येणार असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.